आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Kartarpur Corridor | Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi On Kartarpur Corridor Bhaskar Special By Ravinder Singh Robin.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकची 'ना'पाक चाल:29 जूनपासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू होणार; कराराअंतर्गत 7 दिवस आधी सांगायचे होते, जेणेकरुन भारत तयारी करू शकेल

अमृतसरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो लाहोरचा आहे. शनिवारी महाराजा रणजितसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमास सुरुवात झाली. 2 जून पर्यंत चालणार आहे - Divya Marathi
फोटो लाहोरचा आहे. शनिवारी महाराजा रणजितसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमास सुरुवात झाली. 2 जून पर्यंत चालणार आहे
  • कोरोना व्हायरसमुळे भारत आणि पाकिस्तानने कॉरिडॉर 16 मार्च रोजी बंद केले होते

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले करतारपुर कॉरिडॉर 29 जूनपासून पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. याबाबत भारताला देखील कळवले आहे. यादरम्यान महाराजा रणजीत सिंह यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी करतारपुर कॉरिडॉर सुरू करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील कोविड-19 चे वाढते रुग्ण पाहता 16 मार्च रोजी तात्पुरते बंद केले होते. 

पाकिस्तानची गुगली 

येथे एका गोष्टीचा उल्लेख करणे फार महत्वाचे आहे. डिसेंबर 2018 मध्ये कुरैशी यांनी करतारपुर कॉरिडॉर सुरू करण्याच्या प्रस्तावावर म्हटले होते की, ही पाकिस्तानची गुगली आहे. याचे प्रत्युत्तर भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, तुम्ही ज्या गुगली शब्दाचा वापर केला. तो तुमचा खरा चेहरा समोर आणतो. यावरून स्पष्ट होते की, तुमच्या मनात शिखांसाठी आदर नाही. तुम्ही फक्त गुगलीच खेळत आहात. 

अखेर, इतकी घाई कशासाठी?

कोरोना महामारीमुळे कॉरिडॉर तात्पुरता बंद केला होता. हा धोका अद्यापही कायम आहे. पाकिस्तानात 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 4 हजारांपेक्षा अधिकांचे मृत्यू झाले आहेत. पाकिस्तानमध्ये कोविड - 19 चा धोका टाळला आहे हे कुरेशी यांना सिद्ध करायचे आहे का? कॉरीडोर सुरू करण्यापूर्वी त्यांनी भारताला मार्गदर्शक तत्त्वांविषयी (एसओपी) बोलण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील आरोग्य क्षेत्रातील सर्वात वाईट परिस्थिती कुणापासून लपून राहिलेली नाही.

पाकिस्तानला काय सिद्ध करायचे आहे?

वास्तविक पाकिस्तान स्वत:ला मैत्री आणि शांततेचे वकील म्हणून सिद्ध करण्याचा कट रचत आहे. 27 जून रोजी कॉरिडॉर खुले करण्याची घोषणा करतो. यासाठी फक्त 2 दिवसांचा अवधी दिला. दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत, कोणत्याही भेटीसाठी किमान 7 दिवस अगोदर एकमेकांना माहिती द्यावी लागते. यामुळे भारताला देखील तयारीसाठी वेळ मिळाला असता. नोंदणी प्रक्रिया सुरू केली असती. 

पूलही बांधला नाही

कराराअंतर्गत पाकिस्तानला आपल्याकडून रावी नदीवर पूल बांधायचा होता. परंतु असे केले नाही. पूल बांधला असता तर शिख भाविकांची प्रवास सुरक्षित आणि सोपी झाली असती. पावसाळ्यात हा पूल आणखी महत्वाचा बनतो. 

बर्‍याच वर्षांपासून 250 शिखांची तुकडी महाराजा रणजितसिंग यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी लाहोरला जात आहे. मात्र, यावेळी पाकिस्तानने शिखांना व्हिसासाठी आमंत्रित केले नाही. परिस्थिती पाहता शीख भक्तांनी भारतीय उच्चायोगांशी संपर्क साधला नाही. शेर-ए-पंजाबने लाहोर येथे महाराजा रणजितसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम सुरू केला आहे. 29 जून रोजी याचा समारोप होईल.

बातम्या आणखी आहेत...