आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Kathy Sullivan, 68, Is The First Woman In The World To Return To The Spacewalk After Touching The Sea Floor.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आधी स्पेसवाॅक, नंतर सर्वात खाेल समुद्रतळाला स्पर्श करूनपरतणारी 68 वर्षांची कैथी सुलिवान जगातील पहिली महिला

हीथर मर्फी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नासा अंतराळवीर कॅथीने समुद्रातील मरियाना गर्ता येथे दीड तास केला व्यतीत
  • 1984 मध्ये स्पेस वॉक करणारी अमेरिकेतील पहिली महिला ठरली

केवळ अंतराळात चालत फेरफटकाच नाही तर समुद्रात सर्वात खाेलवर असलेल्या मरियाना ट्रेंचमधील तब्बल ३५ हजार ८१० फूट खाेल चॅलेंजर डीपच्या पृष्ठभागाला स्पर्श करणाऱ्या अमेरिकेतील ६८ वर्षांच्या डाॅ. कॅथी सुलिवान या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. इयाॅस एक्स्पेडिशन्स नावाच्या लाॅजिस्टिक कंपनीच्या मदतीने त्यांनी हा आश्चर्याचा सुखद धक्का दिला. व्हिक्टर एल व्हेस्काेव्हाेही त्यांच्या साेबत हाेते. चॅलेंजर डीपवर दाेघांनी तब्बल दीड तास व्यतीत केला. तब्बल ४ तासांनी दाेघेही आपल्या जहाजावर परतले आणि नंतर अवकाशात तब्बल २५४ मैलावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील अंतराळवीरांशी दाेघांनी गप्पाटप्पाही मारल्या. डाॅ. कॅथी यांनी रविवारी हा अनाेखा कारनामा केला. मरियाना ट्रेंच गुआमपासून अंदाजे २०० मैल दूर आहे. एक अंतराळवीर आणि सागरी तज्ज्ञ या दाेन्ही अंगाने विचार करता हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस हाेता. जीवनात एकदाच हाेणाऱ्या चॅलेंजर डिपचा अनुभव घेऊन अंतराळातील आपल्या सहकाऱ्यांबराेबर त्याच्या नाेंदीची तुलना करणे खराेखरच संस्मरणीय आहे. समुद्रसपाटीपासून २० ते ३६ हजार फूट खाेलवर आम्ही जी छायाचित्रे काढली ती खराेखरच अभूतपूर्व असल्याच्या भावना डाॅ. कॅथी यांनी व्यक्त केल्या. जर तुम्ही एव्हरेस्टला चॅलेंजर डीपमध्ये ठेवले तर त्याचे शिखर सागराच्या तळापासून एक मैलपेक्षा जास्त खाेल असेल. एव्हरेस्टचे िशखर आणि चॅलेंजर डीपच्या तळापर्यंत पाेहोचणे खूपच आव्हानात्मक असते. कारण दाेन्ही ठिकाणच्या हवेच्या दाबात खूप फरक असताे.

१९८४ मध्ये स्पेस वॉक करणारी अमेरिकेतील पहिली महिला ठरली

डाॅ. कॅथी १९७८मध्ये नासामध्ये रुजू झाल्या. ११ आॅक्टाेबर १९८४ रोजी अंतराळात चालणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. याच माेहिमेच्या दरम्यान ‘हबल स्पेस टेलिस्काेप’ लाँच करण्यात आला हाेता. हबल ही पृथ्वीच्या कक्षेत फिरणारी वेधशाळा असून तिने गेल्या ३० वर्षांत अनेक मनाेहारी दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत.

बातम्या आणखी आहेत...