आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील गुफा मंदिर बातूमध्ये देशातील सर्वात मोठे पर्व थाईपुसम सुरू आहे. कावड यात्रेला समर्पित या पर्वात रविवारी १ लाखाहून जास्त भाविक दाखल झाले होते. १० दिवसांच्या या पर्वात तामिळांचे आराध्य दैवत भगवान मुरुगन यांना समर्पित आहे. हिंदू भाविकांसह अनेक देशांतील पर्यटकही लाइमस्टोनच्या गुहेत पोहोचतात. मान्यतेनुसार, धन, बळ आणि बुद्धीची देवता मुरुगनने (भगवान गणेशाचा भाऊ कार्तिकेय) भाल्याने राक्षसांचा नाश करून मानवतेचे संरक्षण केले होते. त्यांच्या आराधनेतून प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. गुहामंदिरात भगवान मुरुगनच्या दरबारापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना अनेक किमी चालून २७२ पायऱ्या पार कराव्या लागतात. गुहेच्या मधोमध भगवान मुरुगनचा दरबार आहे. गुहेत श्री सबरीमाला मंदिर २२३ वर्षे जुने आहे. तेव्हापासून हे धार्मिक अनुष्ठान होत आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.