आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Kawasaki's New Syndrome Of Corona In American Children; Symptoms Like Fever, Rashes And Stomach Pain

न्यूयॉर्क टाइम्सकडून:अमेरिकेतील मुलांमध्ये दिसून आला नवीन 'कावासाकी' सिंड्रोम; ताप, चक्कर येणे आणि पोटदुखीनंतर अनेकांना ठेवावे लागले व्हेंटीलेटरवर

न्यूयॉर्क टाइम्सकडून2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोहेन चिल्ड्रन्स मेडिकिल सेंटरमध्ये 5 रुग्ण दाखल, सर्वांचे वय 4 के 12 दरम्यान
  • 8 वर्षीय मुलाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली, पण शरीरात अँटीबॉडीज सापडल्या
  • या आजारात मुलांच्या ब्लड व्हेसल्सवर सुज येते, खासकरुन कोरोनरी आर्ट्रीजवर

कोरोना महामारीच्या सुरुवातीला मुलांमध्ये श्वसनासंबंधी त्रास दिसून आला नव्हता. पण, मागील काही आठवड्यांपासून न्यूयॉर्क सिटी, लॉन्ग आयलँड आणि दुसऱ्या हॉटस्पॉट परिसरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिंड्रोम दिसून आले आहेत. त्यामुळे, मुलांना जास्त धोका असल्याचा संशय संशोधकांनी व्यक्त केला आहे. या लक्षणांना मुलांमध्ये आढळणारा आजार 'कावासाकी'शी जोडून पाहीले जात आहे. या आजारात ब्लड व्हेसल्समध्ये सुज येते, खासकरुन कोरोनरी आर्ट्रीजमध्ये.

मागील दोन दिवसात कोहेन चिल्ड्रन्स मेडिकिल सेंटरमध्ये पाच गंभीर रुग्णां भर्ती करण्यात आले आहे. या सर्वांचे वय 4 ते 12 वर्षादरम्यान आहे. या रुग्णांमध्ये एक विचित्र आजार पाहण्यात आला आहे, जो कुठेतरी कोव्हिड-19 शी संबंधित आहे. यातच लाल जीभ आणि सुजलेल्या कोरोना आर्ट्रीजनी ग्रस्त एकूण 25 मुलांना दाखल करण्यात आले आहे. सध्या हा सिंड्रोम अमेरिकेतील मुलांमध्ये दिसून येत आहे, जो मागच्या महिन्यात युरोपमध्ये आढळून आला होता. परंतू, आतापर्यंत या आजारामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

माहिती गोळा करत आहेत डॉक्टर्स

अमेरिकेतील एकूण रुग्णांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. डॉक्टर्स याला पीडियाट्रिक मल्टीसिस्टम इंफ्लेमेट्री सिंड्रोम म्हणत आहेत. कोहेन चिल्ड्रन्स मेडिकिल सेंटरचे डॉक्टर जेम्स श्नाइडरने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, आजार दोन आठवड्यांपासून सुरू झाला आहे, आम्ही याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 

काही मुलांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले

या आजाराने ग्रस्त असलेल्या काही मुलांना श्वसनास त्रास होत असल्याने, त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. 10 ते 20 मुलांचा उपचार केलेले कोलंबिया विश्वविद्यालय आणि न्यूयॉर्क-प्रेस्बिटेरियन मॉर्गन स्टेनली चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे डॉक्टर स्टीवन कर्नीने म्हणाले की, हा फक्त आतड्यांचा आजार असल्याचे दिसत नाहीये. याचा संबंध कोरोना व्हायरसशी किंवा कावासाकीशी आहे का, जाणून घेण्याची गरज आहे.

काय आहे कावासाकी आजार?

-6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांवर परिणाम करणाऱ्या या कावासाकी डिसीजला अमेरिकेत दुर्मिळ समजले जाते. याच्या सुरुवातीला ताप आणि चक्कर येते. परंतू, यावर उपचार न केल्यास गंभीर ह्रदयसंबंधी रोग होऊ शकतो. 

-शॉक, कावासाकी आजाराचा एक असामान्य त्रास आहे. डॉक्टर कर्नीने सांगितले की, कोरोना व्हायरसनंतर काही मुलांमध्ये लो ब्ल्ड प्रेशरसोबत शॉकमध्ये आहेत. त्यांच्या शरीरात इतर अवयवांपर्यंत ऑक्सीजन आणि पोषण पोहचण्यास अडचण येत आहे.

-सुरुवातीला केलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लवकर होत नाही. सिटी डेटानुसार न्यूयॉर्क सिटी मध्ये आतापर्यंत कोविडने झालेल्या 13724 मृत्यूमध्ये 17 पेक्षा कमी वयाचे फक्त 6 रुग्ण आहेत.

-परंतू, डॉक्टरांचे म्हणने आहे की, निरोगी मुलांमध्ये हा नवीन सिंड्रोम दिसत आहे. पण, आजही वयस्करांच्या तुलनेत मुले कोरोनापासून दूर आहेत.

-एनवाययू लँगोन मेडिकल सेंटरमधील डॉक्टर जेनिफर लाइटर सांगतात की, हा आजार खुप दुर्मिळ आहे. पण मुले याचा सामना करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...