आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:लहानसहान टेन्शन घेत राहा... यामुळे तुमचा मेंदू कायम तरुण राहतो, वृद्धापकाळही आनंदात जातो

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राेजच्या धावपळीच्या जीवनात लहानसहान तणाव घेणे चांगले ठरू शकते, असे कुणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु असा ताण आराेग्यासाठी लाभदायी ठरताे. कारण त्यामुळे मेंदू तरुण राहताे आणि वृद्धावस्था चांगली राहावी यासाठी मदत हाेते, असा दावा एका ताज्या संशाेधकांनी केला आहे.

१९९० च्या एका संशाेधनात अशा प्रकारचे लहान-लहान ताणतणाव आराेग्यासाठी घातक असल्याचे मानले जात हाेते. परंतु पहिल्यांदाच फिरदाैस डाभर नावाच्या अमेरिकन मानसतज्ज्ञाने न्यूयाॅर्क राॅकफेलर विद्यापीठाच्या मदतीने एक शास्त्रीय अध्ययन केले. छाेट्या स्वरूपातील ताणतणाव आपल्या इम्युन सिस्टिमवर परिणाम करतात. आधुनिक जगासाठी असे तणाव गरजेचे आहेत. उदाहरणार्थ अॅथलिटसाठी आगामी धावण्याची स्पर्धा आणि त्यावरून येणारा तणाव आवश्यक असताे. अशा तणावातून हृदय व मांसपेशींना बळकटी मिळते. यातून व्यक्तीच्या कामगिरीत सुधारणा हाेऊ शकते. एका अन्य पाहणीनुसार साध्या स्वरूपातील शारीरिक व मानसिक तणावामुळे शरीरात इंटरल्यूकिन नावाचे रसायन स्रवते.

व्यायामामुळे मेंदूचे वय ४ वर्षांनी कमी हाेते
मानवी मेंदूचा आकार ४० वर्षांनंतर प्रत्येक दशकामध्ये पाच टक्क्यांनी कमी होतो. वयाच्या ७० वर्षांनंतर ही घट अधिक होते. मात्र, मेंदूचा हा संकाेच नियमित व्यायाम करणाऱ्या वृद्धांमध्ये चार वर्षांनी कमी हाेताे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. लहान स्वरूपातील तणावाने मेंदू तरुण राहतो.

बातम्या आणखी आहेत...