आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो:83 वर्षीय केनिचींनी केला प्रशांत महासागर पार

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जपानचे ८३ वर्षीय केनिची होरी शनिवारी नवा विक्रम आपल्या नावे करतील. प्रशांत महासागर एकट्याने आणि न थांबता यॉटने नौकानयन करून विक्रम करणारे ते पहिले वयोवृद्ध व्यक्ती ठरणार आहेत. ते २७ मार्च रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियातून आपल्या ९९० किलो आणि १९ फूट लांब सेलबोट-सेनटोरी मरमेड थ्रीतून निघाले होते. शनिवार, ४ जून रोजी ते प्रशांत महासागर पार करत न थांबता नौकानयन करून शिकोकू बेटावरून वाकायामाला पोहोचतील. यानंतर ते टोकियोला जातील. ते या प्रवासात सातत्याने सॅटेलाइट फोनवरून कुटुंबीयांशी संपर्कात होते.

बातम्या आणखी आहेत...