आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:केनिया : क्वॉरंटाइनमधून बाहेर पडण्यासाठी पैशांची मागणी

नैरोबी (केनिया)एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न वापरल्याने डांबले, अजब कारवाई

(अब्दी लतीफ दाहिर)

केनिया सरकारला कोरोनाचे आव्हान असतानाच आता क्वॉरंटाइनमधील लोकांना मिळत असलेल्या वागणुकीवरून विरोध आणि टीकेचा सामना करावा लागत आहे. नैरोबीत क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या लोकांना १४ दिवस पूर्ण झाल्यानंतरही बाहेर निघू दिले जात नाही. बाहेर निघू देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत. त्यांच्यावर झालेला खर्च वसूल केला जात असल्याचे सांगितले जात आहे. असेच एक प्रकरण व्हॅलेंटाइन ओचोगो यांचे आहे. त्या सांगतात, जेव्हा मी दुबईतील हॉट एअर बलून व्यवसायातील नोकरीवरून काढून टाकल्यानंतर केनियात आले असता एका विद्यापीठाच्या वसतिगृहात इतर प्रवाशांसोबत क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले. मात्र, १४ दिवस क्वॉरंटाइन आणि तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरही मला बाहेर जाऊ दिले नाही. जोपर्यंत मी ४३४ डॉलर म्हणजे सुमारे ३१ हजार रुपये देत नाही तोपर्यंत जाता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. माझ्याकडे इतके पैसे नसल्याने मी निराश झाले आणि दरवाजा बंद करून रडू लागले. मी पैसे कमी करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी ऐकले नाही. शेवटी ६५ डॉलर म्हणजे सुमारे चार हजार रुपये देण्याचे ठरले आणि मी ३२ दिवसांनी तेथून बाहेर निघू शकले. आता स्वतंत्र व समाधानी आहे. मात्र तेथे अनेक जण फसले आहेत. केनियात संचारबंदीचे उल्लंघन करणे किंवा मास्क न घातल्याने पकडण्यात आलेल्या लोकांना पोलिस ठाण्यात न पाठवता क्वॉरंटाइन केले जात आहे. त्यांना तर अनेकदा बाधितांसोबत ठेवले जाते. नुकतेच तेथून आणखी ७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तेथे पुरेसे अन्न, पाणी नव्हते तसेच चाचणीचा निकालही सांगत नव्हते. बाहेर जाण्यासाठीही पैसे घेण्यात आले.दरम्यान, क्वॉरंटाइनमध्ये लोकांना वाईट वागणूक दिल्याचे बाहेर समजल्यानंतर लोक सरकारला विरोध करू लागले आहेत. मोई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सहायक प्राध्यापक डाॅ. लुकोए अॅटलोव्ही म्हणाले, लोकाना करण्याऐवजी लोकांना सहकार्यासाठी तयार करण्याची गरज आहे.

५० जण क्वॉरंटाइनमधून पळाले; लोकांची चाचणीसाठी टाळाटाळ

गेल्या एका महिन्यात ५० जण क्वॉरंटाइनमधून पळून गेले आहेत. तसेच क्वॉरंटाइन केंद्रातील दुर्व्यवहार आणि पैसे मागण्याच्या वृत्तानंतर आता कोरोनाची लक्षणे दिसत असली तरी लोक क्वॉरंटाइनमध्ये पाठवल्यानंतर पैसे कोठून देणार? यामुळे सरकारने व्यवस्था चांगली केली जात असल्याचे म्हटले आहे.ये लोकांकडून पैसे मागणे बंद करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...