आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Accounts For 59% Of The Highest Number Of Landslides In The Country, With 378 Deaths In Landslides In The Last Six Years.

भूस्खलन वाढले:देशात भूस्खलनाच्या सर्वात जास्त 59% घटना केरळात, गेल्या 6 वर्षांत भूस्खलनात 378 जणांचा मृत्यू

के.ए. शाजी |तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांत १५ सेंमीहून जास्त पाऊस झाला. त्यामुळे भूस्खलन वाढले आहे. इडुक्की व तोडुपुझा येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात संपूर्ण घर कोसळले. त्यात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. देशभरात २०१५ ते २०२२ दरम्यान भूस्खलनाच्या ३ हजार ७८२ घटना घडल्या. त्यापैकी केरळमध्ये २ हजार २३९ घडल्या. देशातील एकूण जमिनीपैकी १.१८ टक्के एवढी केरळने व्यापलेली आहे. परंतु भूस्खलनाच्या एकूण घटनांपैकी ५९.२ टक्के केरळमध्ये होतात.

केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल अ‌ॅडमिनिस्ट्रेशनच्या आपत्ती व्यवस्थापन सल्लागार एस. श्रीकुमार यांच्या म्हणण्यानुसार १९६१ ते २०१६ पर्यंत म्हणजेच ५५ वर्षांमध्ये केवळ २९५ जणांचा भूस्खलनात मृत्यू झाला. परंतु त्यानंतरच्या सहा वर्षांत ३७४ जणांचा भूस्खलनामध्ये मृत्यू झाला. श्रीकुमार भास्करला म्हणाले, २०१८ च्या पुरानंतर राज्यात मोठी हानी झाली. त्यात प्राणहानीचादेखील समावेश आहे. ऑगस्टमध्ये मुसळधार पावसामुळे दुर्घटना होतात. त्याशिवाय ढगफुटीच्या घटनांमुळे भूस्खलनही वाढले. इडुक्की, पठानथिट्टा, कोट्टायम, वायनाड, त्रिशूर, कन्नूर व कोझिकोडेसारख्या जिल्ह्यांत बेमोसमी पाऊस झाल्याने दुर्घटनांत वाढ झाली. प्रशासनाने परिस्थितीबद्दल वेळीच अवगत केले नाही. त्यात अपयश आले. हवामानतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकारने संवेदनशील क्षेत्रात भूस्खलनापासून बचावाच्या दृष्टीने योग्य ती पावले टाकली नाहीत. भूमी व आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. केजी थारा म्हणाले, राज्याच्या स्थानिक शाखांना तत्काळ मॅपिंगचे काम दिले जावे. भूस्खलनाचे प्रमाण जास्त होऊ शकणाऱ्या भागांची माहिती मॅपिंगमुळे मिळू शकते. त्यातही वॉर्डस्तरावर मॅपिंग व्हायला हवे. त्यामुळे लहानात लहान धोकादेखील ओळखता येऊ शकेल. त्याचबरोबर केरळच्या राज्य आपत्ती व्यवस्थापनातदेखील बदल होणे अपेक्षित आहे. त्याची फेरमांडणी केली जावी.

अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम वाढले

नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडिजचे माजी वैज्ञानिक डॉ. के. व्ही. थॉमस दैनिक भास्करला म्हणाले, पश्चिमेकडील घाटांच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन होते. बांधकामही वाढत चालले आहे. त्यामुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढले. या भागात वैज्ञानिक पद्धतीने बांधकाम करणे अपेक्षित आहे. ही पद्धत अवलंबली गेली नाही तर धोका वाढू शकतो. श्रीकुमार म्हणाले, संवेदनशील भागात अधिकाऱ्यांचे मौन समर्थन आहे. त्यामुळे बांधकाम सुरूच आहेत. भूस्खलनाच्या बहुतांश भागात रबराची झाडे लावलेली दिसतात.

बातम्या आणखी आहेत...