आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी आग:बांगलादेशमध्‍ये कापड बाजारपेठेतील 3000  दुकाने खाक; आग विझविण्यासाठी लष्कर सरसावले

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशची राजधानी ढाक्यात मंगळवारी सकाळी मोठी आग लागली. यामुळे येथील सुमारे ३००० दुकाने भस्मसात झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन जवानांसोबत लष्करालाही पाचारण केले आहे. लष्कर आणि नौदलासह ४८ युनिट आणि ६०० पेक्षा जास्त अग्निशमन जवान या कामात गुंतले आहेत. आगीमुळे ८ लोक भाजले आहेत.

अग्निशमन विभागाला सकाळी ६.१० वाजता माहिती मिळाली होती. यानंतर काही वेळात जवान दाखल झाले. ईदआधी बाजारात लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी १९९५ मध्ये अशीच आग लागली होती.