आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियातील भारतविरोधी खलिस्तानी चळवळ अनिर्बंध झाली आहे. मेलबर्नमध्ये सोमवारी आणखी एका मंदिराला लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. येथील अल्बर्ट पार्क मंदिराच्या भिंती खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणांनी रंगवण्यात आल्या होत्या. गेल्या १५ दिवसांत मंदिरांवर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. आतापर्यंत एकाही घटनेत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे खलिस्तान समर्थक कोणतीही भीती न बाळगता मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते भक्त दास, म्हणतात की आम्ही घाबरलो आहोत. हिंदू समाज हताश झाला आहे, कुठे तक्रार करावी? ऑस्ट्रेलियन पोलिस काेणतीही कारवाई न करता गप्प आहेत. हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन आणि ऑस्ट्रेलिया शीख संघटनेचे सचिव डॉ.अलबेल सिंग कांग यांनी या घटनेचा निषेध केला आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला स्थानिक पोलिसांसमाेर हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हिंदू संघटनांनी भिंद्रनवाले समर्थित खलिस्तानी पोस्टरला केला विरोध : २९ जानेवारीला मेलबर्नमध्ये होणारे कथित खलिस्तान जनमत (सार्वमत) हे मंदिरांवर हाेत असलेल्या हल्ल्यांमागील कारण असल्याचे मानले जात आहे. एका समुदायाच्या नेत्याने सांगितले की, भिंद्रनवाले यांचे समर्थन करणारी खलिस्तानी पोस्टर जानेवारीच्या सुरुवातीला लावण्यात आली होती. त्याला विरोध करताना हिंदू संघटनांनी स्थानिक प्रशासनाला पत्रेही लिहिली. मात्र प्रशासनाने पोस्टर्स काढली नाहीत. मात्र काही ठिकाणी खलिस्तानी पोस्टरवर रंग लावण्यात आला. तेव्हापासून मंदिरांवर भारतविरोधी घोषणा रंगविल्या जाण्याच्या घटना समोर येत आहेत.
हल्ल्यांप्रकरणी कुणासही अटक नाही
{१२ जानेवारीला मेलबर्न मिली पार्कमधील स्वामी नारायण मंदिराच्या भिंतींवर घाेषणा दिसल्या. {१६ जानेवारीला कॅरम डाउन्समधील शिव विष्णू मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या.
ऑस्ट्रेलियन पोलिसांबाबत दोन मोठे प्रश्न...
{मेलबर्नमधील तिन्ही हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज, पुरावे म्हणून सोशल मीडियावरील पोस्टही दिल्या, पण कारवाई का झाली नाही?
{खलिस्तान समर्थकांकडून कथित सार्वमताच्या समर्थनार्थ मेलबर्नमध्ये भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आली, निषेधही नोंदवला गेला, पण कारवाई का नाही?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.