आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Khwaja Nizamuddin, Gilani And Sharif Were Removed From The Post Of Prime Minister In April, Latest News And Update

एप्रिलमध्ये 3 पाक पंतप्रधानांची गेली खूर्ची:ख्वाजा निजामुद्दीन, गिलानी व शरीफ यांची याच महिन्यात करण्यात आली होती पंतप्रधानपदावरुन उचलबांगडी, आता इम्रान यांचा क्रमांक?

इस्लामाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची खूर्ची राहणार की जाणार? याचा फैसला येत्या रविवारी होईल. त्यात इम्रान यांचे पंतप्रधानपद गेले, तर एप्रिलमध्ये खूर्ची सोडण्याची वेळ आलेले ते पाकचे चौथे पंतप्रधान ठरतील. पाकिस्तानात यापूर्वी ख्वाजा निजामुद्दीन, नवाज शरीफ व युसूफ रझा गिलानी या 3 पंतप्रधानांना एप्रिल महिन्यात आपले पद सोडावे लागले होते. विशेष म्हणजे या तिघांचीही खूर्ची वेगवेगळ्या कारणांनी गेली. पण, पद जाण्याचा काळ मात्र जवळपास एकच होता. तो म्हणजे....एप्रिलचा महिना.

ख्वाजा निजामुद्दीन

ख्वाजा निजामुद्दीन पाकचे दुसरे पंतप्रधान होते. लियाकत अली खान यांच्या हत्येनतंर त्यांनी सत्ता सांभाळली होती. पण, अवघ्या दीड वर्षांतच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. तत्कालीन गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांनी 17 एप्रिल 1953 रोजी त्यांचे सरकार बरखास्त करुन मोहम्मद अली बोगरा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.

मोहम्मद अली जिन्ना यांच्यासमवेत ख्वाजा निजामुद्दीन. ते पाकचे दुसरे पंतप्रधान होते. लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर त्यांनी पाकची सूत्रे सांभाळली होती.
मोहम्मद अली जिन्ना यांच्यासमवेत ख्वाजा निजामुद्दीन. ते पाकचे दुसरे पंतप्रधान होते. लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर त्यांनी पाकची सूत्रे सांभाळली होती.

गव्हर्नर जनरल मलिक त्यावेळी लाहोरमधील दंगल व आर्थिक कारणांमुळे सरकार बरखास्त केले होते. याविरोधात निजामुद्दीन कोर्टात गेले. पण, काहीच फायदा झाला नाही.

नवाज शरीफ

बेनझीर भुट्टो यांचे सरकार गेल्यानंतर 1990 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर नवाज शरीफ यांचे आघाडी सरकार सत्तेत आले. नवाज पंतप्रधान झाले. पण, 3 वर्षांतच तत्कालीन राष्ट्रपती गुलाम इसाक खान यांच्यासोबतच्या मतभेदांनंतर त्यांना सत्ता सोडावी लागली. शरीफ यांनी 18 एप्रिल 1993 रोजी नॅश्नल असेंब्ली भंग करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नवाज यांनी तीनवेळा पंतप्रधान म्हणून पाकची सूत्रे सांभाळली आहेत. पण, दुर्दैवाने त्यांना एकदाही आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
नवाज यांनी तीनवेळा पंतप्रधान म्हणून पाकची सूत्रे सांभाळली आहेत. पण, दुर्दैवाने त्यांना एकदाही आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

त्यानंतर पुन्हा 2 महिन्यांनी नवाज यांनी पंतप्रधानपद सांभाळले. पण, यावेळी त्यांना लष्कराच्या दबावामुळे सत्ता सोडावी लागली. त्यानंतर पुन्हा निवडणूक होऊन बेनझीर भुट्टो सत्तेत परतल्या.

युसूफ रझा गिलानी

युसूफ रझा गिलानी यांनी 24 वे पंतप्रधान म्हणून 25 मार्च 2008 रोजी पाकची सूत्रे हाती घेतली. पण, त्यांनाही एप्रिलमध्येच राजीनामा द्यावा लागला. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमाननेप्रकरणी त्यांना अपात्र घोषित केले होते. त्यानंतर 25 एप्रिल 2012 रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

युसूफ रझा गिलानी यांना तत्कालीन राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांना वाचवण्याच्या प्रयत्नांत आपले पद गमवावे लागले.
युसूफ रझा गिलानी यांना तत्कालीन राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांना वाचवण्याच्या प्रयत्नांत आपले पद गमवावे लागले.

गिलानींवर कोर्टाच्या आदेशांनंतरही तत्कालीन राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांना पत्र न लिहिल्याचा आरोप होता. गिलानीनंतर परवेज अशरफ यांची पाकचे पंतप्रधानपदी निवड झाली होती.

आता इम्रान यांचा क्रमांक?

इम्रान खान येत्या रविवारी संसदेच्या पटलावर आपले बहुमत सिद्ध करणार आहेत. अनेक सहकाही पक्षांनी व खासदारांनी त्यांचा पाठिंबा काढल्यामुळे त्यांचे सरकार कोसळणार हे स्पष्ट आहे. पण, त्यानंतरही ते सरकार वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या प्रकरणी शेवटपर्यंत हार न मानण्याचा निर्धार केला आहे.

पाकमध्ये आतापर्यंत 7 काळजीवाहू व 22 पंतप्रधान झालेत

14 ऑगस्ट 1947 रोजी भारतातून विभक्त होऊन अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानात आतापर्यंत 22 पंतप्रधान झालेत. पण, यापैकी एकालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. नवाज शरीफ यांनी सर्वाधिक काळ पाकवर राज्य केले. तर चौधरी सुजात हसन यांना सर्वात कमी काळ पंतप्रधानपदी राहता आले. पाकिस्तानात आतापर्यंत 7 काळजीवाहू पंतप्रधान झालेत.

एकाही पंतप्रधानाला पूर्ण करता आला नाही 5 वर्षांचा कार्यकाळ
एकाही पंतप्रधानाला पूर्ण करता आला नाही 5 वर्षांचा कार्यकाळ
बातम्या आणखी आहेत...