आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Kidnapped Sikh Family Of Four Killed In America, Kidnapped In California, 8 month old Girl Also Killed

अमेरिकेत अपहृत शीख कुटुंबातील चौघांची हत्या:कॅलिफोर्नियात अपहरण, 8 महिन्यांची मुलगीही ठार

सॅन फ्रान्सिस्काे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून अपहरण केलेल्या शीख कुटुंबातील चौघांचे मृतदेह एका बागेत सापडले. पंजाबमधील होशियारपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या या कुटुंबाचे सोमवारी अपहरण झाले हाेते. जसदीप सिंग (३६), त्यांची पत्नी जसलीन कौर (२७), ८ महिन्यांची कन्या आरुही आणि भाऊ अमनदीप (३९) यांचे मृतदेह इंडियाना रोड आणि हचिन्सन रोडजवळील बदामाच्या बागेत सापडले आहेत, असे मर्सिड काउंटीचे पोलिस अधिकारी वर्न वार्नेके यांनी सांगितले.

संशयित अपहरणकर्ता जीझस मॅन्युएल सालगाडाे याला पकडले होते. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलिसांनी अपहरणाच्या घटनेशी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जसदीप आणि अमनदीप इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. दाेघांचेही हात बांधलेले आहेत. त्याच वेळी अपहरणकर्ता जसलीन आणि आरुहीला बाहेर काढताना दिसतो. अमनदीपला अमेरिकेत स्थायिक होण्याच्या अर्जाला मंजुरी मिळाली होती.

नोकरीतून काढल्याने अपहरणकर्ता चिडला होता अमेरिकेत हत्या झालेल्या व्यक्ती पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी रणधीर सिंह यांचा मुलगा, सून आणि नात होते. अपहरणाची बातमी आल्यानंतरच रणधीर आणि त्याची पत्नी कृपाल अमेरिकेला गेले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मारेकरी सालगाडो (४८ वर्षे) हा मेक्सिकोचा आहे. तो अमनदीपच्या वाहतूक कंपनीत कामाला होता. वर्षभरानंतर त्याला नाेकरीवरून काढून टाकण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...