आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Kidnapping Of A Christian Girl In Pakistan, Conversion, Hundreds Of Christian Brothers On The Streets In Karachi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मांतर:पाकिस्तानात ख्रिश्चन मुलीचे अपहरण, धर्मांतर, कराचीत शेकडाे ख्रिस्ती बांधव रस्त्यावर

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कराचीत प्रेस क्लब, सेंट पॅट्रिक चर्चच्या परिसरात लाेकांनी इम्रान सरकारच्या विराेधात घाेषणाबाजी केली.

पाकिस्तानात १३ वर्षीय ख्रिश्चन मुलीचे अपहरण व बळजबरी धर्मांतर करून विवाह केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अली अजहर असे ४४ वर्षीय आराेपीचे नाव आहे. सूत्रांच्या मते आराेपीने कराचीत १३ आॅक्टाेबर राेजी ख्रिश्चन मुलीचे भरदिवसा रेल्वे काॅलनी येथून तिच्या घराच्या बाहेरून अपहरण केले हाेते.

त्यानंतर मुलीने स्वखुशीने इस्लाम कबूल करत अपहरण करणाऱ्या अली अजहरसाेबत विवाह केल्याचे पाेलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. पाेलिस खाेटे बाेलत असल्याचा मुलीच्या कुटुंबाने आराेप केला आहे.

पाेलिसांनी आराेपीसाेबत हातमिळवणी केल्याचाही आराेप मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे. तत्पूर्वी सिंध उच्च न्यायालयाने मुलीच्या विवाहाला वैध ठरवतानाच मुख्य आराेपीवर कारवाई केली जाऊ नये, असे स्पष्ट केले हाेते. मुलीची आई रिटा मसीह यांनी काेर्ट परिसरात काही लाेकांनी धमकी दिल्याचा आराेप केला.

कुटुंबाने मुलीला परत मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या विराेधात शेकडाे लाेकांनी निदर्शने केली. ह्यूमन राइट्स फाेकस पाकिस्तानचे (एचआरएफपी) अध्यक्ष नवीद वाॅल्टर म्हणाले, पाकिस्तानात ख्रिश्चन व हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर व विवाहाची प्रकरणे वाढू लागली आहेत. सरकारचा त्यावर काहीही अंकुश राहिलेला नाही.