आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उत्तर कोरिया:किम जोंगची कमाल, 10 दिवसांत उभारले आधुनिक गाव

प्योंगयांगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाच्या कुमचॉन काऊंटीमध्ये मॉडर्न सोशलिस्ट फॉर्म व्हिलेज तयार करण्यात आले आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला या काऊंटीमध्ये कंगबुक री भागात प्रचंड वादळ आल्याने १ हजारांहून अधिक गावे उद्ध्वस्त झाली. यामुळे हजारो लोक बेघर झाले. तेव्हा देशाचे राज्यकर्ते किम जोंग उन यांनी लष्कराच्या अभियांत्रिकी विभागास बेघरांसाठी कंगबुक रीमध्ये आधुनिक गाव वसविण्याचे आदेश दिले. लष्करातील अभियंत्यांनी या गावातील पडलेल्या घरांचे अवघ्या दहा दिवसांत बांधकाम पूर्ण केले. इतकेच नव्हे तर त्यास आधुनिक स्वरूप दिले. यादरम्यान, किम जोंग या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. हृांगे प्रांताचे प्रशासन चांग हो यांनी गुरुवारी या गावाचे उद्घाटन केले. यावेळी शेकडो लोकांची उपस्थिती होती. सरकारी माध्यमांनी याची छायाचित्रे जारी केली.