आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम जोंग उन गंभीर आजारी:आता 9 वर्षीय मुलगी उत्तर कोरियावर राज करण्याची शक्यता, बहिणीसह मुलीला देत आहे ट्रेनिंग

प्योंगयांग23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, किम जोंग उन सध्या आपली बहीण व 9 वर्षांच्या मुलीला भविष्यात देशाची सत्ता सांभाळण्यासाठी तयार करत आहे. यामागे उत्तर कोरियाची सूत्रे कायम आपल्या कुटुंबीयांकडे रहावीत असा त्याचा हेतू आहे.

उत्तर कोरियाने गत काही वर्षांत वेगवेगळ्या निमित्ताने जारी केलेल्या छायाचित्रांत किम जोंग उन यांचे वजन कमी झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासूनच ते आजारी असल्याचे मानले जात आहे.

द सनच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते 40 वर्षीय किम यांचा लवकर मृत्यू झाला किंवा सुप्रीम लीडर म्हणून त्यांनी खुर्ची सोडली तरी उत्तर कोरियावरील त्यांची सत्ता कायम राहील. किम यांच्यानंतर त्यांची छोटी व शक्तिशाली बहीण किम यो जोंग उत्तर कोरियावर राज करेल. यासंबंधी किम यांची 9 वर्षीय मुलीविषयीही वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. ती नुकतीच आपल्या वडिलांसोबत एका क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण पाहण्यासाठी गेली होती. उत्तर कोरियाचा मीडिया सातत्याने या मुलीचा उल्लेख प्रेमळ व अनमोल कन्या म्हणून करत आहे.

बहीण सांभाळणार सत्ता?

या बातम्यांमुळे उत्तर कोरियातील भविष्यातील नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. किम यांची 35 वर्षीय बहीण गत अनेक वर्षांपासून प्रशासनाची सूत्रे हलवत आहे. ती किम यांची विश्वासूही आहे. त्यामुळे किम जोंग उन यांना सत्ता सोडावी लागली किंवा त्यांचे निधन झाले तर उत्तर कोरियाचे नेतृत्व किम यो जोंग यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

मुलीचाही शासनात होणार समावेश

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या केंद्रीय नेतृत्वात किम यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा समावेश होईल. किम यांच्या इनर सर्कलमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांचा म्हणजे त्यांची बहीण, पत्नी री सोल जू, भाऊ किम जोंग चूल, मुलगी जू एई व त्यांचे उच्चपदस्थ जनरल किम जो हून, जनरल चो रयोंग हे व मार्शल पाक जोंग चोन यांचा समावेश आहे. आपल्या वडिलांसह क्षेपणास्त्र स्थळी गेल्यामुळे किम यांची मुलगी त्यांची उत्तराधिकारी होऊ शकते अशीही चर्चा आहे. दरम्यान किम यांना हायपरटेंशन, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल व चेन स्मोकिंगसंबंधी आजार असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...