आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन सोमवारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. वर्कर्स पार्टीच्या 75 व्या वर्धापनदिनानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी सैनिकांचे आभार मानले. आपल्या चुकाविषयी माफी मागितली. नंतर पाणावलेले डोळे पुसताना दिसले. यादरम्यान सैनिकांच्या बलिदानाचाही उल्लेख केला. तसेच त्यांनी उत्तर कोरियात कोरोनाची कोणतीही केस नसल्याचा दावाही केला.
शाळकरी मुलांचीही उपस्थिती
वर्कर्स पार्टीच्या 75 व्या स्थापना दिवसासाठी अनेक दिवसांपासून तयारी केली जात होती. देशातील विविध भागांमध्ये हजारो लोक राजधानी प्योंगयांगमध्ये पोहोचले होते. सर्वात पहिले मिलिट्री परेड झाली. यामध्ये नॉर्थ कोरियाची सैन ताकद दाखवण्यात आली. मिसाइलही दिसल्या. किम जोंग उननेही सलामी घेतली. यानंतर भाषण दिले. यादरम्यान शाळकरी मुलांचीही उपस्थिती होती.
Kim Jong Un has attended the ruling party's 75th anniversary celebrations.
— SkyNews (@SkyNews) October 11, 2020
The anniversary of the ruling Worker's Party is often marked with concerts and festivals in the capital Pyongyang.
Read more here: https://t.co/04tot8LE8g pic.twitter.com/0JRxv9ttY5
सैनिकांचे मानले आभार
किम म्हणाले - मी आपल्या सैनिकांचे बलिदान आणि त्यांच्या धैर्यासाठी आभारी आहे. आपण अनेक कठोर आव्हानांचा समना केला आहे. नुकताच देशातने वादळ आणि कोरोना व्हायरसचा सामना केला आहे. या दरम्यान सैनिकांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, ते किती कठीण परिस्थितीत काम करु शकतात. त्यांनी देशाला वादळापासून वाचवले आणि व्हायरसपासूनही वाचवले. जर देशाच्या विकासात मी अपयशी ठरलो असेल तर माफी मागतो. या दरम्यान किम चष्मा काढून अश्रू पुसताना दिसले.
नॉर्थ कोरियामध्ये संक्रमण नाही
किम पुढे म्हणाले की, मला या गोष्टींचा आनंद आहे की, आपल्या देशात कोरोनाची एकही केस नाही. मात्र साउथ कोरिया आणि अमेरिका किम जोंग यांच्या या दाव्यावर नेहमीच प्रश्न उपस्थित करत राहिले आहेत. किम म्हणाले - 'माझे प्रयत्न पर्याप्त नसतील ठरले. मात्र मला माहिती आहे की, माझ्या देशातील लोक माझ्यावर किती प्रेम करतात यूएनच्या एका रिपोर्टनुसार, नॉर्थ कोरियाचे 40 टक्के लोकांना जेवणाची कमतरता आहे. नुकत्याच आलेल्या वादळ आणि कोरोनाने येथील अर्थव्यवस्था खूप कमजोर केली आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.