आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरिया:देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे हुकूमशाह भडकला, मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांना दिली मृत्यूदंडाची शिक्षा

सियोल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकाऱ्यांनी डिनर पार्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने परत एकदा आपले कौर्य दाखवले आहे. किमने देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हुकूमशाहच्या आदेशावर त्या पाचही अधिकाऱ्यांना गोळी मारण्यात आली.

डिनर पार्टीमध्ये केली होती अर्थव्यवस्थेवर चर्चा

नॉर्थ कोरियातील प्रकरणांवर नजर ठेवणाऱ्या साउथ कोरियातील साइट डेली एनकेने सांगितल्यानुसार, अर्थ मंत्रालयातील या पाच अधिकाऱ्यांनी डिनर पार्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. यादरम्यान त्यांनी किमच्या निर्णयांची निंदा केली होती.

30 जुलै रोजी दिली शिक्षा

साउथ कोरियन साइटनुसार, या चर्चेची माहिती किम जोंगला कोणीतरी दिली. त्यानंतर किमने त्यांच्याकडून कबुल करुन घेतले की, त्यांनी देशाला कमजोर करण्याचे कृत्य केले आहे. त्यानंतर 30 जुलै रोजी त्या सर्व अधिकाऱ्यांना गोळी मारली.

काकाला उपाशी कुत्र्यांना खायला दिले

सत्तेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी किम जोंगने त्याचे काका किम जोंग थाएकला 120 उपाशी कुत्र्यांना खायला दिले होते. चीनी वृत्तपत्र‘वेन वई पो’ ने दावा केला होता की, शिक्षेदरम्यान किम जोंगसह 300 अधिकारी समोर उपस्थित होते. या सर्वांसमो 67 वर्षीय थाएकला शिकारी कुत्र्यांना दिले होते. थाएकच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या थाएकाच्या पत्नीलाही विष देऊन मारले होते.

सावत्र भावाची मलेशियात हत्या केली

किम जोंग उनने आपला सावत्र भाऊ किम जोंग नामची मलेशिया हत्या घडवून आणली होती. फेब्रुवारी 2015 मध्ये मलेशियाच्या विमानतळावर दोन मुलींनी विषारी पिन मारुन किम जोंग नामची हत्या केली. नामवर उत्तर कोरियाविरोधात गुप्तहेरी करण्याचा आरोप लावला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser