आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाची पाने:किंग चार्ल्स डायनाच्या लोकप्रियतेवर जळत होते; विवाहित कॅमिलावर केले प्रेम, वाचा ब्रिटनच्या राजाचा वादग्रस्त जीवनपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

27 ऑक्टोबर 1981 ची गोष्ट...प्रिन्स चार्ल्स आपल्या 20 वर्षीय पत्नी प्रिन्सेस डायनासह हनीमूनवरून वेल्सला पोहोचले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होती. पण नागरिकांच्या नजरा प्रिन्स चार्ल्सपेक्षा त्यांची पत्नी डायनावर खिळल्या होत्या. चार्ल्स सोडून त्यांना प्रिन्सेस डायनाशी हस्तांदोलन करायचे असते.

ही गोष्ट चार्ल्सला एवढी खटकते की, त्यांनी आपल्या नातेवाईकांना स्पष्टच सांगितले-

'जनता मला नाही तर माझ्या बायकोला भेटायला आली होती.'

पीपल मॅगझिनच्या मते, प्रिन्स चार्ल्सच्या मनात येथूनच स्वतःच्या पत्नीबद्दलच्या मत्सराची सुरुवात झाली. आता या घटनेला 42 वर्षे लोटल्यानंतर चार्ल्स यांचा ब्रिटनचे राजे म्हणून राज्याभिषेक होत आहे.

चला तर मग आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊन चार्ल्स यांचा ब्रिटनच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्याचा वादग्रस्त अन् तेवढाच रंजक प्रवास...

किंग चार्ल्स यांची कहामी 1952 मध्ये सुरू होते

ब्रिटनचे 6 वे राजे जॉर्ज यांचे 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांची कन्या ते जिला प्रेमाने 'लिलिबेट' म्हणत, सिंहासनावर बसते. जग तिला राणी एलिझाबेथ-II नावाने ओळखते. आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेल्या एलिझाबेथचे आयुष्य 1953 मध्ये राणी झाल्यानंतर पूर्णतः बदलले. याचा परिणाम त्यांच्या 2 मुलांवरही होतो. किंग चार्ल्स हे त्यापैकी एक होते. त्यांचा जन्म 1948 मध्ये झाला. राणीचा मोठा मुलगा असल्यामुळे वयाच्या 5 व्या वर्षीच तो गादीचा वारस झाला.

न्यूयॉर्करच्या मते, चार्ल्स यांचा जन्म झाला तेव्हा ते शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत होते. यामुळे, त्यांची आई व वडील प्रिन्स फिलिप अत्यंत नाराज होते. एकदा किंग चार्ल्स यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या आईला वाटले की तो गतीमंद आहे. चार्ल्स घोड्यांना घाबरत होता. तसेच खेळातही चांगला नव्हता.

याऊलट त्यांची बहीण प्रिन्सेस अॅनी या सर्व गोष्टी अगदी सहजपणे करत असे. या कारणास्तव, प्रिन्स फिलिप यांनी मुलगा चार्ल्सपेक्षा मुलगी अॅनी हिला अधिक पसंती दिली. त्यांना वाटले की, चार्ल्स खूप भावनिक आहे. चार्ल्स यांना राजगादीसाठी तयार करण्यासाठी फिलिप त्यांना स्कॉटलंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो. तिथ इतर विद्यार्थी त्यांच्यावर दादागिरी करायचे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, चार्ल्स यांना कमी ग्रेड मिळाल्यानंतरही केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळतो. तिथे झालेल्या अंतिम परीक्षेतही त्यांना अत्यंत कमी गुण मिळाले. त्याचा दोष त्यांच्या राजेशाही कर्तव्यांना दिला जातो.

14 नोव्हेंबर 1952 रोजी राणी एलिझाबेथ-II (मध्यभागी), त्यांच्यासोबत त्यांची कन्या राजकुमारी अॅनी (डावीकडे) व प्रिन्स चार्ल्स (उजवीकडे).
14 नोव्हेंबर 1952 रोजी राणी एलिझाबेथ-II (मध्यभागी), त्यांच्यासोबत त्यांची कन्या राजकुमारी अॅनी (डावीकडे) व प्रिन्स चार्ल्स (उजवीकडे).

टॉयलेट सीट गळ्यात लटकवून नेव्ही सोडली
राजघराण्यातील सदस्यांना ब्रिटीश सैन्यात सेवा करणे आवश्यक आहे. त्यामुळे वडील प्रिन्स फिलिप यांच्या आग्रहावरून चार्ल्स रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाले. तिथेही त्यांना नेव्हिगेटर म्हणून आपली छाप उमटवता आली नाही. यामुळे त्यांना संपर्क अधिकारी करण्यात आले.

चार्ल्स यांनी नेव्ही सोडल्यावरही मोठा वाद झाला होता. चार्ल्स यांच्यासोबत नौदलात काम करणारा त्याचा सहकारी पॉल हँके याने हा खुलासा केला. 2015 च्या एका डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी सांगितले की, एकदा चार्ल्स नॉर्थ वेल्समध्ये नौदलाच्या सरावासाठी गेले होते. तिथे जहाजाला पुढे जाता यावे यासाठी त्याचा नांगर वर काढायचा होता.

पण नांगरावर बांधलेल्या एका तारेमुळे तासाभराच्या प्रयत्नानंतरही ते शक्य झाले नाही. त्यामुळे नौदल अधिकारी चार्ल्सवर चांगलेच संतापले. याचा परिणाम असा झाला की, या घटनेनंतर अवघ्या 3 महिन्यांनंतरच ते नौदलातून बाहेर पडले. निरोपावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात टॉयलेट सीट अडकवली. खरे तर चार्ल्स यांच्याबद्दल असे सांगितले जाते की, ते कुठेही गेले तरी ते टॉयलेट सीटचे कव्हर नेहमीच आपल्यासोबत नेतात.

जेव्हा विवाहित कॅमिलाच्या प्रेमात पडले
सिंहासनाचा वारस असल्यामुळे केवळ ब्रिटनच्या लोकांनाच नाही तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबालाही प्रिन्स चार्ल्स यांच्या प्रेम जीवनात खूप रस होता. त्यांनी चुकीची मुलगी निवडावी, असे कुटुंबीयांना वाटत नव्हते. राजकुमारी डायनाशी लग्न करण्यापूर्वी चार्ल्स यांचे कॅमिला नामक विवाहित महिलेवर प्रेम जडले होते. ते त्याविषयी आपल्या वडिलांपेक्षा माउंटबॅटन यांच्याशी जास्त बोलायचे. द न्यूयॉर्करच्या मते, चार्ल्स 1947 मध्ये भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या फार जवळ होते.

माऊंटबॅटनही चार्ल्स यांना लव्ह लाईफविषयी सल्ला देत असत. माऊंटबॅटन यांनी चार्ल्स यांच्या वैयक्तिक जीवनावर अनेक वेळा जाहीर भाष्य केले होते. ते एकदा म्हणाले की चार्ल्स यांच्या बेडवर मुली येत-जात राहतात. त्यांनी चार्ल्स यांना सल्ला दिला होता की, माणसाने शक्य तिवढी अफेअर्स करावीत. माउंटबॅटन यांनी प्रिन्ससाठी पत्नी शोधण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.

पीपल मॅगझिननुसार, चार्ल्स 1972 मध्ये पहिल्यांदा कॅमिलाला भेटले होते. त्यावेळी कॅमिलाने एका पार्टीत चार्ल्स याच्यासोबत थट्टा केली. ती म्हणते माझी आजी तुझ्या आजोबांची शिक्षिका होती. यावरून त्यांच्यात वाद झाला. पण नंतर या भांडणाचे हळूहळू मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर काही महिन्यांनी चार्ल्स 1973 मध्ये रॉयल नेव्ही ड्युटीसाठी निघून गेला. दरम्यान, कॅमिला अँड्र्यू पार्कर नामक व्यक्तीशी लग्न करते.

चित्रात प्रिन्स चार्ल्स (डावीकडे) माउंटबॅटन (मध्यभागी) व चार्ल्स यांचे वडील प्रिन्स फिलिप आहेत.
चित्रात प्रिन्स चार्ल्स (डावीकडे) माउंटबॅटन (मध्यभागी) व चार्ल्स यांचे वडील प्रिन्स फिलिप आहेत.

कॅमिलावर लिहिलेल्या 'द डचेस - कॅमिला पार्कर बॉल्स अँड लव्ह अफेअर दॅट रॉक्ड द क्राऊन' या पुस्तकानुसार, अँड्र्यूचे चार्ल्स यांची बहीण अॅनीशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर या दोघांच्या लग्नसंबंधांत वितुष्ट निर्माण होते. ते वेगळे होतात. या कालावधीत त्या प्रिन्स चार्ल्स यांच्या जवळ येतात. अँड्र्यूचे प्रिन्स अॅनीशी प्रेमसंबंध नसते, तर कदाचित कॅमिला प्रिन्स चार्ल्स यांच्या जवळ आल्या नसत्या, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

चार्ल्स व कॅमिला यांचे नाते अनेक चढउतारांमधून गेले. चार्ल्स मध्यल्या काळात सारा स्पेन्सर नामक मुलीशी डेट करू लागले. याद्वारे त्यांची भेट प्रिन्सेस डायनाशी होते. वास्तविक, डायना स्पेन्सर ही सारा स्पेन्सरची मोठी बहीण होती. 1977 मध्ये, डायना चार्ल्स यांना भेटली तेव्हा त्या केवळ 16 वर्षांच्या होत्या.

प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर.
प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर.

डायनासोबत लग्न करताना रडारड
चार्ल्स यांचे कॅमिलावर प्रेम होते ही गोष्ट त्यांचे कुटुंब व स्वतः राणी एलिझाबेथला माहिती होती. पण चार्ल्स राजगादीचा वारस असल्यामुळे त्यांचे हे नाते केव्हाच पूर्णत्वास जाणार नाही हे ही त्यांना माहिती होते. याचे एक कारण असे होते की, राजघराण्यातील कोणत्याही सदस्याला आपला जोडीदार जिवंत असेपर्यंत घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करता येत नाही.

त्यामुळे नाईलाजाने चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याऐवजी डायना स्पेन्सरशी लग्न करावे लागले. सुरुवातीला चार्ल्स यांच्या संपर्ण कुटुंबाला डायना आवडत होत्या. त्या तरुण, सुंदर व हुशार होत्या. त्यामुळे त्यांना राजघराण्याच्या कार्यात सामावून घेणे फारसे अवघड गेले नाही. 1981 मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यावेळी डायना 20, तर चार्ल्स 32 वर्षांचे होते.

डायनाशी लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी चार्ल्स एका पत्रात म्हणाले होते की, लग्नाच्या रात्री ते खूप रडले होते. राजघराणे व आपल्या देशासाठी डायनाशी लग्न करणे योग्य ठरेल असे त्यांना वाटले होते. पण ते लग्न फार काळ टिकले नाही. राजकुमारी डायना यांनाही चार्ल्स यांच्या कॅमिलावरील प्रेमाची जाणीव झाली. चार्ल्सपासून वेगळे झाल्यानंतर एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'आमच्या लग्नात 3 जण होते'.

प्रिंसेस डायना व प्रिन्स चार्ल्स लग्नाच्या दिवशी.
प्रिंसेस डायना व प्रिन्स चार्ल्स लग्नाच्या दिवशी.

जेव्हा चार्ल्स यांना त्यांच्या पत्नीच्या ऑस्ट्रेलियातील लोकप्रियतेचा हेवा वाटू लागला
29 मार्च 1983 रोजी प्रिन्स चार्ल्स त्यांची पत्नी डायनासह ऑस्ट्रेलियात आले. याठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. गर्दीच्या आकर्षणाचे केंद्र प्रिन्स चार्ल्स नव्हे तर 5 फूट 10 इंच उंच, सोनेरी केस व तपकिरी डोळे असलेली राजकुमारी डायना होती. प्रत्येकाला डायनाला उघड्या डोळ्यांनी पहायचे होते, तिच्याशी हस्तांदोलन करायचे होते. अचानक गर्दीतून एक जण बोलला - प्रिन्स चार्ल्स, तू खूप भाग्यवान आहेस की, तुला डायनासारखी पत्नी मिळाली.

हे ऐकून प्रिन्स चार्ल्स यांनी रागाने उत्तर दिले - 'महिलांची हीच खासियत असते. दुसऱ्या बाजूला वळताच ती मागे काय करते हे सांगणे कठीण आहे.' त्यानंतर डायना व त्यांच्यात वाद झाला. प्रिन्स चार्ल्स आपल्या पत्नीला सांगतात- 'प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून हा माझा दौरा होता. कॉमनवेल्थ देशात हा दौरा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. पण तू तो तुझ्या आकर्षणाचे केंद्र बनवले.' काही वेळाने प्रिन्स चार्ल्स पुन्हा रागाने डायनाला म्हणाले - 'लोक माझ्यावर हसण्याचे कारण तूच आहेस.' 1995 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, स्वतः प्रिन्सेस डायनानेही हे सांगितले होते की, '1983 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिच्या पतीला तिच्या लोकप्रियतेचा हेवा वाटू लागला.'

हा फोटो ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आहे... प्रिन्स चार्ल्स प्रिन्सेस डायनासोबत दिसून येत आहेत.
हा फोटो ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आहे... प्रिन्स चार्ल्स प्रिन्सेस डायनासोबत दिसून येत आहेत.

...तर चार्ल्स केव्हाच राजे झाले नसते
11 डिसेंबर 1936 रोजी, राणी एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज 6 वे, ब्रिटनच्या सिंहासनावर आरूढ झाले. हे पद त्यांना त्यांचा मोठा भाऊ एडवर्ड-8 यांच्याकडून मिळाले. जेव्हा एडवर्ड यांनी त्यांच्या प्रेमासाठी सिंहासन सोडले. वास्तविक, ते एका अमेरिकन घटस्फोटितेच्या प्रेमात पडले होते. राजघराण्यात गादीवर बसणाऱ्या व्यक्तीला असे करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच त्यांनी पद सोडले.

त्यांनी हे पद सोडले नसते तर आज प्रिन्स चार्ल्स यांचा राज्याभिषेक झाला नसता. राजघराण्यातील परंपरेनुसार सर्वात मोठे अपत्य सिंहासनावर बसते. त्यानुसार 1952 मध्ये, वडिलांनंतर सर्वात मोठी मुलगी म्हणून राणी एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाली. आता त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक होत आहे.