आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग चार्ल्स यांचे हॅरी आणि मेगन यांना राज्याभिषेकाचे निमंत्रण:राजेशाही सोडलेल्या मुलाला पाठवला मेल, पुस्तकातील खुलाशांमुळे वाढली होती नाराजी

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो राजेशाही सोडलेल्या प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांचे आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
हा फोटो राजेशाही सोडलेल्या प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांचे आहे. (फाइल फोटो)

ब्रिटनचे राजघराणे सोडून अमेरिकेत स्थायिक झालेले प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल यांना तीव्र मतभेद असूनही किंग चार्ल्स यांनी आपल्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित केले आहे. खुद्द प्रिन्स हॅरी यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांना राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी आमंत्रित करणारा एक मेल प्राप्त झाला आहे. मात्र, राजेशाही सोडलेल्या या जोडप्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, हे स्पष्ट केलेले नाही.

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल या दोघांनी बकिंघम पॅलेसवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता.
प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल या दोघांनी बकिंघम पॅलेसवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता.

बकिंगहॅम पॅलेसचा टिप्पणी करण्यास नकार

दुसरीकडे, बकिंगहॅम पॅलेसने या निमंत्रणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. खरं तर, याआधी असे अनेक अहवाल समोर आले होते ज्यात प्रिन्स हॅरी आणि मेघन यांना राज्याभिषेकाला आमंत्रित केले जाणार नाही, असा दावा करण्यात आला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, मे महिन्यात होणाऱ्या राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी काही खास लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.

या सर्वाना छापील कार्ड पाठवण्यात आले आहेत. याआधीच प्रिन्स हॅरी यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, ते आपल्या वडिलांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहणार का? यावर हॅरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, माझे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत, आता त्यांना हे ठरवायचे आहे की, मला बोलवायचे की नाही.

प्रिन्स हॅरी त्यांचे वडील किंग चार्ल्स यांच्यासह. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स राजा झाले.
प्रिन्स हॅरी त्यांचे वडील किंग चार्ल्स यांच्यासह. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स राजा झाले.

3 दिवसांपूर्वीच हॅरी-मेगन यांच्याकडून काढून घेतले रॉयल हाऊस

ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना बकिंगहॅम पॅलेसने तीन दिवस आधीच रॉयल हाऊस सोडण्यास सांगितले होते. हा आदेश राजा चार्ल्स यांनी दिला होता. ब्रिटिश वृत्तपत्र 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, घर रिकामे केल्यानंतर सर्व सामान अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला पाठवले जाईल.

रॉयल फॅमिली सोडल्यापासून हॅरी-मेगन अमेरिकेत राहत आहेत. एवढेच नाही तर चार्ल्स यांनी हे घर त्यांचे बंधू प्रिन्स अँड्र्यूसाठी रिकामे केले आहे. म्हणजेच, आता प्रिन्स अँड्रयू येथे राहणार आहेत.

हा फोटो प्रिन्स हॅरी यांचे पुस्तक 'स्पेअर'चा आहे.
हा फोटो प्रिन्स हॅरी यांचे पुस्तक 'स्पेअर'चा आहे.

डॉक्यूमेंट्री आणि पुस्तकामुळे बिघडले नातेसंबंध

2020 मध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी राजेशाही सोडताच ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंध बिघडले. तथापि, प्रिन्स हॅरी यांची नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली डॉक्युमेंट्री आणि त्यानंतरचे त्यांचे 'स्पेअर' हे पुस्तक यामुळे दोन्ही बाजूंमधील वाद आणखी वाढला आहे. पुस्तक आणि डॉक्यूमेंट्रीत प्रिन्स हॅरी यांनी राजघराण्यावर अनेक प्रकारे टीका केली आहे.

पुस्तकातील खुलासे येथे वाचा...

  • प्रिन्स हॅरी यांनी लिहिले की, जेव्हा प्रिंसेस डायना म्हणजेच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा राजा चार्ल्स यांनी त्यांना मिठीही मारली नाही.
  • प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांना कॅमिला आवडत नसल्याचंही पुस्तकात लिहिलं आहे. दोन्ही भावांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे राजा चार्ल्स यांना त्यांच्याशी लग्न करू नका असे सांगितले होते. त्यांना भीती होती की, कॅमिला त्यांना सावत्र आई बनून त्रास देईल.
  • हॅरी यांनी लिहिले की, जेव्हा ते पहिल्यांदा इटन कॉलेजमध्ये गेले तेव्हा तिथे आधीच शिकत असलेल्या प्रिन्स विल्यम यांना ते आवडले नव्हते.
  • हॅरी यांनी पुस्तकात खुलासा केला आहे की त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिल्यांदा ड्रग्ज घेतले होते. त्यांनी अनेक वेळा ड्रग्ज घेतले पण त्याचा आनंद कधीच घेता आला नाही.
  • हॅरी यांनी पहिल्यांदा कौमार्य गमावल्याची कहाणी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, त्यावेळी ते 17 वर्षांचे होते आणि ज्या महिलेसोबत त्यांचे संबंध होते ती त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठी होती.
  • हॅरी यांनी लिहिले की, 2019 मध्ये एका वादाच्या वेळी विल्यम यांनी त्यांची कॉलर पकडली आणि नंतर त्यांना जमिनीवर आदळले होते. हॅरी यामुळे श्वानाच्या अन्नाच्या एका वाडग्यावर पडले. त्यांच्या वजनाखाली ते तुटले आणि हॅरी यांच्या पाठीत तुकडे टोचले. यामुळे हॅरी यांच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...