आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • King Charles Coronation | Official Portraits Released | Queen Camilla | Prince William | Royal Family

राजाचे कौतुक:किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा संपला; कुटुंबाचे PHOTOS जारी; विल्यम - केट दिसले, प्रिंस हॅरी नाही​​​​​​​

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीश राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्याने प्रथमच नवा राजा व राणीचे अधिकृत पोर्ट्रेट प्रसिद्ध केले. या पोट्रेटमध्ये चार्ल्स यांनी जांभळ्या रंगाचे कपडे व शाही वस्त्रे परिधान केली आहेत. त्यांच्या डोक्यावर इम्पीरियल राज्य मुकुट आहे. तर हातात राजदंड व सार्वभौम ओर्ब आहे. ते ज्या सिंहासनावर बसलेत, ते 121 वर्षे जुने आहे. ते तत्कालीन राजा जॉर्ज पंचम व राणी मेरी यांच्यासाठी तयार करण्यात आले होते.

याशिवाय राजघराण्याने अन्यही काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात नवी राणी कॅमिला, राजा व राणीचा एकत्र फोटो व कौटुंबिक फोटोंचा समावेश आहे. फोटोंमध्ये राजा-राणीसोबतच सिंहासनाचा वारसदार प्रिन्स विल्यम व त्याची पत्नी केटही दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या फोटो सेशनसाठी प्रिन्स हॅरीला निमंत्रित करण्यात आले नव्हते.

राजघराण्याने 8 मे रोजी ब्रिटनच्या नवीन राजा-राणीचे अधिकृत पोर्ट्रेट शेअर केले.
राजघराण्याने 8 मे रोजी ब्रिटनच्या नवीन राजा-राणीचे अधिकृत पोर्ट्रेट शेअर केले.

किंग चार्ल्स म्हणाले - अद्भूत सोहळ्यासाठी सर्वांचे आभार
ब्रिटनमधील 3 दिवसीय राज्याभिषेक सोहळ्याच्या शेवटी किंग चार्ल्स यांनी एक संदेश जारी केला. त्यात त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पाहुण्यांचे आभार मानले. ते म्हणाले- मी व माझी पत्नी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला बहुमोल वेळ देणाऱ्या सर्वांचे आभारी आहोत. लंडन, विंडसर व देशभरातील विविध ठिकाणी समारंभांवेळी सुरक्षा व शांतता राखल्याबद्दल सर्वांचे आभार.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ज्यांनी आपल्या घरी किंवा रस्त्यावर पार्ट्या केल्या त्यांचेही आभार. देशातील जनतेने राजघराण्यावर नेहमीच विश्वास दाखवला. त्यामुळे आम्ही आम्ही त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू.

राजा चार्ल्स व राणी कॅमिला यांचे अधिकृत फोटो पाहा...

या फोटोमध्ये राजा चार्ल्स यांनी सार्वभौम ऑर्ब व राजदंड धारण केला आहे. त्यांच्या डोक्यावर शाही राज्याचा मुकुटही आहे.
या फोटोमध्ये राजा चार्ल्स यांनी सार्वभौम ऑर्ब व राजदंड धारण केला आहे. त्यांच्या डोक्यावर शाही राज्याचा मुकुटही आहे.
हे छायाचित्र राणी कॅमिलाचे आहे. राज्याभिषेकानंतरचा हा त्यांचा पहिला अधिकृत फोटो आहे.
हे छायाचित्र राणी कॅमिलाचे आहे. राज्याभिषेकानंतरचा हा त्यांचा पहिला अधिकृत फोटो आहे.

कोहिनूरऐवजी कलिनन हिऱ्याचा मुकुट
राजा चार्ल्स यांनी शाही राज्याचा मुकुट परिधान केला. त्याचे वजन 1.06 किलो आहे. यात 2 हजार 868 हिरे, 17 नीलम, 11 पाचू, 269 मोती व 4 माणिक जडलेले आहेत. हा मुकुट कलिनन II डायमंडने जडलेला आहे. तो कलिनन हिऱ्याचा दुसरा सर्वात मोठा तुकडा आहे. त्याला कोहिनूरच्या जागी लावण्यात आले आहे. कलिनन जगातील सर्वात मोठा हिरा आहे.

चार्ल्स-कॅमिला ब्रिटनची सर्वात वृद्ध राजा-राणी
गत सप्टेंबर महिन्यात राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर चार्ल्स यांच्या नावाची नवे राजे म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर 6 मे रोजी राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. दुपारी साडे 3 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात चार्ल्स व कॅमिला यांना ब्रिटनचे नवे राजा-राणी घोषित करण्यात आले. या निवडीसह किंग चार्ल्स ब्रिटनचे आतापर्यंतचे सर्वात वृद्ध सम्राट बनलेत. किंग चार्ल्स 74 वर्षांचे आहेत. राजा - राणीचा ताफा दुपारी 2:50 वाजता बकिंगहॅम पॅलेसच्या डायमंड ज्युबिली स्टेट कोचमधून बाहेर पडला. त्यानंतर 2 किलोमीटरचा प्रवास करून हा ताफा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये पोहोचला.

तिथे 5 टप्प्यांत राजाचा राज्याभिषेक झाला. सर्वप्रथम त्यांना राजा म्हणून ओळख देण्यात आली. त्यानंतर आर्चबिशपने चार्ल्स यांना शपथ दिली. त्यानंतर त्यांचा अभिषेक झाला. त्यानंतर राजा चार्ल्स यांना सेंट एडवर्डचा मुकुट घालण्यात आला. शेवटच्या टप्प्यात, राजा- राणी त्यांच्या सिंहासनावर बसतात. 80 मिनिटे चाललेल्या या सोहळ्यानंतर राजा-राणी सोन्याच्या रथातून बकिंगहॅम पॅलेसमध्ये परतले. यावेळी 5,000 हून अधिक ब्रिटिश सैनिकांनी मार्चपास्ट केला. राज्याभिषेकानंतर ब्रिटनमध्ये विविध ठिकाणी तोफांची सलामी देण्यात आली.