आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'नव्या राजाचा राज्याभिषेक ही एक अशी घटना आहे, जी बहुतांश लोकांना आपल्या आयुष्यात एकदाच पाहता येते. पण त्यानंतरही त्याचे महत्त्व वेगळे आहे.'- एडवर्ड कॅरोल, वय-70 वर्षे
'राज्याभिषेकाचा हा सोहळा म्हणजे उच्चभ्रूंची पार्टी आहे. त्यांना समाजाचे भान नसते. माझ्या मते, ही परंपरा बदलली पाहिजे. ही केवळ पैशाची उधळपट्टी आहे. - रॉबर्ट, वय-23 वर्षे
एडवर्ड कॅरोल व रॉबर्ट लंडनमध्ये राहतात. तिथे आज 6 मे रोजी किंग चार्ल्स-3 यांचा राज्याभिषेक होणार आहे. या दोघांच्या वयात 47 वर्षांचे अंतर आहे, युनायटेड किंगडमच्या राजेशाहीसंबंधीच्या त्यांच्या विचारातही तेवढाच मोठा फरक आहे. ब्रिटनची राजेशाही तब्बल 1 हजार वर्षे जुनी आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा चार्ल्स राजा झाला. 6 महिन्यांनंतर आता त्यांचा राज्याभिषेक होत आहे. या कार्यक्रमावर सुमारे 1 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. राजेशाहीला विरोध असणाऱ्या संघटनांची संभाव्य निदर्शने पाहता कार्यक्रमावेळी लंडनमध्ये सुमारे 29,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम 10व्या शतकात बांधलेल्या वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार आहे. राजघराण्यातील सर्व राज्याभिषेक याच चर्चमध्ये झालेत. कँटबरी चर्चचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी नवीन राजाची सर्वांना ओळख करून देतील. त्यानंतर राजा चार्ल्स शपथ घेईल. ही शपथ 335 वर्षांपूर्वी लिहिण्यात आली आहे.
किंग चार्ल्स यांना 1661 मध्ये बनवलेल्या सेंट एडवर्ड यांचा मुकुट घातला जाईल. 2.23 किलो वजनाचा व 2,868 हिरे जडलेला हा मुकुट राज्याभिषेकाच्या वेळी फक्त एकदाच परिधान केला जातो. शेवटच्या वेळी राणी एलिझाबेथ II यांनी 70 वर्षांपूर्वी 2 जून 1953 रोजी हा मुकुट परिधान केला होता.
देशातील लोकांना राज्याभिषेक साजरा करण्यासाठी ब्रिटनमध्ये 8 मे पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. जवळपास 1 तास चालणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे 2000 देशी-विदेशी पाहुणे सहभागी होतील. लंडनमध्ये या कार्यक्रमाची तयारी गत अनेक आठवड्यांपासून सुरू होती. किंग चार्ल्स व राजघराण्याचे बॅनर-पोस्टर रस्त्यांवर लागलेत. घराबाहेर ब्रिटिशांचे झेंडे आहेत. बार, रेस्टॉरंट व सुपरमार्केटही सजवण्यात आले आहे.
ब्रिटनमधील सामान्य नागरिकि व इतर देशांतील प्रवासी नागरिक या कार्यक्रमाकडे कसे पाहतात, राजघराणे व राजेशाहीविषयी त्यांचे काय विचार आहेत, हे समजून घेण्यासाठी आम्ही काही नागरिकांशी संवाद साधला. यात ब्रिटीश वृद्ध, तरुण तथा भारत, पाकिस्तान, बांगलादेश येथून स्थायिक झालेल्या नागरिकांचा समावेश आहे.
वाचा हा लंडनमधील ग्राउंड रिपोर्ट...
हा वन्स इन अ लाइफटाइम इव्हेंट...
एडवर्ड कॅरोल, 70, मानसिक आरोग्य सेवा प्रदाता सिग्नेट हेल्थकेअरमध्ये शेफ म्हणून काम करतात. क्वीन एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला त्याचवर्षी त्यांचा जन्म झाला. म्हणजे एडवर्ड कॅरोल हे ब्रिटनच्या राजाचा प्रथमच राज्याभिषेक पाहणार आहेत. ते म्हणतात, 'बहुतांश लोकसंख्येसाठी ही आयुष्यातील एकमेव घटना आहे. नव्या पिढीला पुढच्या काही वर्षांत राजाचा राज्याभिषेक क्वचितच पाहायला मिळेल.
सध्याच्या काळात राजेशाहीचा अर्थ किती बदललाहे? या प्रश्नाच्या उत्तरात, एडवर्ड म्हणतात की 'ब्रिटनसह बहुतांश देशांमध्ये राजघराणे नेहमीपेक्षा जास्त अॅप्रोचेबल आहे. स्पेनचे माजी राजे जुआन कार्लोस माद्रिदच्या रस्त्यावर लोकांमध्ये मिसळलेले दिसात. राजघराण्यांकडे आता केवळ राजा किंवा राणी म्हणून पाहिले जात नाही. त्यांना समाजाचा एक घटक म्हणून पाहिले जात आहे. समाज स्वीकार करेल तोपर्यंत राजेशाही राहील.
एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा काही उपयोग आहे का? याला उत्तर देताना एडी म्हणतो, 'हा कार्यक्रम पाहण्यासाठी देश-विदेशातील प्रतिनिधी व पत्रकार येथे आलेत, पर्यटनाच्या दृष्टीने ते चांगले आहे.'
ब्रिटन आता फक्त ब्रिटिशांचे नाही, राज्याभिषेकाने काही फरक पडणार नाही: रॉबर्ट
जुने ब्रिटिश लोक राज्याभिषेकाला परंपरेचा एक भाग म्हणून पाहतात. पण नवीन पिढीची विचारसरणी वेगळी आहे. 23 वर्षीय रॉबर्ट लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. राज्याभिषेकाविषयी तो म्हणतो, 'या कार्यक्रमावर प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करावा. मी सुपरस्टोअरमध्ये जातो तेव्हा मला कधी अंडी, तर कधी टोमॅटो मिळत नाहीत. सरकारने त्यावर लक्ष द्यावे, राहणीमानाचा खर्च हा मोठा प्रश्न आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
राज्याभिषेक ब्रिटिश संस्कृतीचा भाग आहे की, वारशाचा? यावर रॉबर्ट म्हणाले, 'ब्रिटन आता फक्त ब्रिटिशांचे राहिलेले नाही. जगभरातील लोक येथे स्थायिक झालेत, येथे वैविध्य आहे. त्यामुळे लंडन किंवा यूकेच्या बहुतांश भागांत लोकांना राजा किंवा राणीच्या राज्याभिषेकात कोणताही रस नाही.
पाकिस्तानात जन्मलेला पण लंडनमध्ये वाढलेला सिराजही रॉबर्टशी सहमत आहे. त्याला कॅमेऱ्यापुढे बोलायचे नव्हते. तसेच त्याचे नावही उघड करायचे नव्हते. त्यामुळे त्याचे खरे नाव लपवण्यात आले आहे.
ते म्हणतात, 'रॉयल फॅमिली फक्त करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. लोकांकडे दैनंदिन गरजांसाठी पैसे नाहीत. हाउसिंग मार्केटचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे राज्याभिषेकावर लाखो डॉलर्सचा खर्च करणे कितपत न्यायोचित आहे?'
लंडनमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांसाठी राज्याभिषेकाचा अर्थ...
रफी आलम यूकेमध्ये व्यवस्थापन सल्लागार आहेत. ते म्हणतात, 'किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक हा केवळ ब्रिटनसाठी मोठा कार्यक्रम नाही, तर संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. अशी ऐतिहासिक घटना 70 वर्षांनंतर घडत आहे. येथे राहणारे इतर देशांतील नागरिकही याचे साक्षीदार आहेत. या सोहळ्यावर सरकार अमाप पैसा खर्च करत आहे हे खरे आहे, पण त्याचे सकारात्मक पैलूही पहावे लागतील. जगभरातून लोक हा सोहळा पाहण्यासाठी येतील. जागतिक माध्यमांसाठी ते मुख्य आकर्षण असेल.
भारतातील केरळचे रहिवासी असलेले जॉन जॉर्ज हे मार्केटिंग क्षेत्रात काम करतात. ते लंडनच्या झोन-5 मध्ये राहतात. राज्याभिषेक हा संस्कृतीचा एक भाग असल्याचे नमूद करत ते म्हणतात, 'प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते. भारतातही असे अनेक कार्यक्रम होतात. हा तसाच एक कार्यक्रम आहे. प्रत्येकाला स्वतःची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. तथापि, यूकेची अर्थव्यवस्था चांगली असो की वाईट हा निव्वळ पैशाचा अपव्यय आहे,
तन्मय व्यवहारे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून, तो लंडनस्थित स्टार्टअपमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्यांच्या मते, 'हा फक्त सुट्टीचा व बाहेरून आलेल्या लोकांसाठी विश्रांतीचा दिवस असतो.' इतर अनेक कंपन्यांप्रमाणे तन्मयच्या कंपनीनेही राज्याभिषेकाच्या दिवशी कर्मचाऱ्यांसाठी आऊटिंग व लंचचे आयोजन केले आहे. पण तन्मयला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.
स्थलांतरीतांसाठी राजेशाही व राजघराण्याचा अर्थ…
बांगलादेशी नागरिक रफी आलम म्हणतात, 'ब्रिटनमधील राजघराण्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. त्याच्या उपस्थितीकडे सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिले पाहिजे. राजघराणे सरकारी निर्णयांत हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे मला त्यात काही गैर दिसत नाही. ही घटनात्मक राजेशाही आहे.
घटनात्मक राजेशाहीमध्ये राज्याचा प्रमुख राजा किंवा राणी असतो. पण सरकार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे चालवले जाते. राज्यघटनेनुसार राजा किंवा राणीला अत्यंत मर्यादित अधिकार आहेत.
यूकेला सध्या राजेशाहीची किती गरज आहे? यावर रफी म्हणतात, 'माझ्या मते यूकेमध्ये त्याचा कोणताही नकारात्मक प्रभाव नाही. बोरिस जॉन्सन आले व गेले. लिझ ट्रस देखील गेल्या. पण राजघराणे अजूनही आहे. यूकेच्या सर्वच चांगल्या व वाईट काळात. मला वाटते की, राजघराणे पालकासारखे वागते.
दुसरीकडे, केरळच्या जॉन जॉर्ज यांचे मत आहे की, 'करदात्यांचा पैसा राजघराण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी खर्च केला जात आहे, जे योग्य नाही'. यूकेने आता या व्यवस्थेतून बाहेर पडून इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
भारताची हर्षिता सांगते की, 'या कार्यक्रमाचा खूप हाईप करण्यात आला आहे. प्रिन्स चार्ल्स हे त्यासाठी पात्र आहेत. सोहळ्यावर एवढा पैसा खर्च केला जाऊ नये. हा पैसा इतरत्र वापरता आला असता.
त्याचवेळी तन्मय म्हणतो की, 'ब्रिटनमधील लोक राजघराण्याकडे पालक म्हणून पाहतात. अनेक प्रसंगी राजघराण्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. राजघराणे शेकडो वर्षांपासून आहे. त्यांची उपस्थिती नाकारता येत नाही.
ब्रिटनमधील राजेशाहीवर प्रश्नचिन्ह
राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे मार्च 2021 मध्ये निधन झाले. त्यानंतर मार्केट रिसर्च व डेटा विश्लेषक फर्म YouGov ने राजेशाहीच्या आवश्यकतेवर एक सर्वेक्षण केले. त्यात ब्रिटनमधील 63 टक्के लोकांनी राजेशाही भविष्यातही कायम राहावी असे म्हटले आहे. 25% लोक म्हणाले की, त्यांना देशात फक्त निवडून आलेले सरकार हवे आहे. 10% लोकांनी यावर भाष्य करणे टाळले.
18 ते 24 वयोगटातील काही लोकांना ब्रिटनमध्ये राजेशाही हवी आहे. तर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतांश लोकांना राजघराण्याची देखभाल करायची असते. रॉयल हाउसहोल्डने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये राजघराण्याला सरकारकडून खर्चासाठी 884 कोटी रुपये मिळाले. या खर्चामुळे लोक राजेशाही मोडीत काढण्याची मागणी करतात.
YouGov ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, 51% लंडनवासीयांनी असे म्हटले आहे की, करदात्यांच्या पैशाचा राज्याभिषेकासाठी वापर करू नये. तथापि, 32% लोकांची त्यावर कोणतीही हरकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.