आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटीश रॉयल फॅमिली आणि प्रिन्स हॅरी-मेगन मर्केल यांच्यातील दूरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना रॉयल होम सोडण्यास सांगण्यात आले आहे. राजा चार्ल्स यांनी हा आदेश काढला. ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, घर खाली केल्यानंतर सर्व सामान अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला पाठविण्यात येणार आहे. रॉयल फॅमिली सोडल्यापासून प्रिन्स हॅरी-मेगन अमेरिकेत राहत आहेत.
एवढेच नाही चार्ल्स यांनी हे घर त्यांचा भाऊ प्रिन्स अँड्र्यूसाठी खाली करायला लावले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता प्रिन्स अँड्र्यू या ठिकाणी राहणार आहेत. 2 महिन्यांपूर्वी राजा चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यूला सेक्स स्कँडल प्रकरणी बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल केले होते. बर्कशायरमधील विंडसर कॅसलजवळ 'फ्रोगमोर कॉटेज' हे प्रिन्स हॅरी-मेघन यांचे घर आहे. प्रिन्स हॅरीच्या 'स्पेअर' पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांचे घर खाली करण्याचा हा निर्णय करण्यात आला.
प्रिन्स हॅरीने 'स्पेअर' पुस्तकात केले अनेक खुलासे
'स्पेअर' या पुस्तकाने केवळ प्रिन्स हॅरीचे जीवनच उलगडले नाही. तर संपूर्ण ब्रिटिश कुटुंबाची गुपितेही उघड केली. या सर्व खुलाशांमुळे राजघराणे प्रिन्स हॅरीवर नाराज झाले होते.
वाचा पुस्तकात केलेले खुलासे
प्रिन्स अँड्र्यूवर सेक्सस्कॅंडलचा आरोप
प्रिन्स अँड्र्यूवर माजी मॉडेल व्हर्जिनिया गिफ्रेने सेक्स स्कॅंडलचा आरोप केला. ती म्हणाली की, जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा जेफ्री एपस्टाईन (प्रकरणातील मुख्य आरोपी) तिला अँड्र्यूकडे घेऊन गेले आणि प्रिन्सचे तिच्याशी संबंध होते.
त्यामुळे राजा चार्ल्स यांनी राजघराण्यातून काढले होते
या आरोपावर कारवाई करत राजा चार्ल्स यांनी त्याला राजघराण्यातून काढून टाकले. त्याची सुरक्षाही काढून घेण्यात आली. पण आता त्याने प्रिन्स अँड्र्यूला फ्रोगमोर कॉटेजमध्ये राहण्याची ऑफर दिली आहे. मात्र, त्यांनी असा निर्णय का घेतला, याचे मुख्य कारण अद्यापही समोर आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.