आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री विंडसर कॅसल येथे एक मैफल रंगली. यात अमेरिकन गायिका केटी पेरी, लिओनेल रिची, पॉप ग्रुप टेक दॅटसह अनेक सेलिब्रिटींनी सादरीकरण केले. या कॉन्सर्टमध्ये 20 हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती होती.
भारतीय अभिनेत्री सोनम कपूरनेही या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. त्यांनी राष्ट्रकुल देशांच्या कामगिरीची ओळख करून दिली. सोनम कपूरने या सोहळ्यात विशेष व खास गाऊन परिधान केला होता. जो भारत आणि ब्रिटनच्या दोन डिझायनर्सनी संयुक्तपणे तयार केला होता.
विल्यम म्हणाला - पा तुमच्यावर अभिमान
विंडसर कॅसल येथील कॉन्सर्टमध्ये किंग चार्ल्स, क्वीन कॅमिला, प्रिन्स विल्यम, त्यांची पत्नी आणि मुले उपस्थित होती. प्रिन्स विल्यमने मैफल मध्ये बोलतांना सांगितले की, पिता (वडील) आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. किंग चार्ल्स यांच्या गेल्या 50 वर्षांतील कामगिरीबद्दलही विल्यम यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला.
टॉम क्रूझ आणि बेअर ग्रिल्स यांनी शेअर केले मेसेज
या कॉन्सर्टचे आयोजन डाउनटाउन अॅबी या चित्रपटाचे स्टार ह्यू बोनविले यांनी केले होते. यामध्ये हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, मॅन व्हर्सेस वाइल्ड बेअर ग्रिल्सचे प्रसिद्ध होस्ट आणि गायक सर टॉम जोन्स यांनीही ऑनलाईनद्वारे संदेश पाठविला. याशिवाय रॉयल बॅलेट, ऑपेरा, रॉयल कॉलेज आणि रॉयल शेक्सपियर कंपनीने एकत्रित परफॉर्मन्स दिला.
राज्याभिषेकानंतर विशेष भोजनाचे आयोजन
किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्याच्या वतीने खासगी भोजनाचे आयोजन केले होते. यामध्ये केवळ विशेष पाहुण्यांचा समावेश करण्यात आला होता. तथापि, राजघराण्याने पाहुण्यांची घोषणा केली नाही. याशिवाय 2 दिवसांत संपूर्ण ब्रिटनमध्ये सुमारे 67 हजार लंच पार्ट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तथापि, यापैकी कोणत्याही पार्टीला किंग चार्ल्स आणि कॅमिला उपस्थित राहणार नाहीत.
चार्ल्स-कॅमिला ब्रिटनचे सर्वात वृद्ध राजा-राणी बनले
70 वर्षांनंतर शनिवारी ब्रिटनमध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात चार्ल्स आणि कॅमिला यांना ब्रिटनचे नवीन राजा-राणी म्हणून घोषित करण्यात आले. यासह, किंग चार्ल्स हे ब्रिटनचे आतापर्यंतचे सर्वात वृद्ध सम्राट बनले. किंग चार्ल्स 74 वर्षांचे आहेत. किंग-क्वीन मोटारगाडीने दुपारी 2:50 वाजता बकिंगहॅम पॅलेस येथून डायमंड ज्युबिली स्टेट कोच सोडले. यानंतर सुमारे 2 किमी. पर्यंतचा प्रवास करून हा ताफा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये पोहोचला.
येथे 5 स्टेपमध्ये किंग चार्ल्स आणि कॅमिला यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. सर्वप्रथम त्यांना राजा म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर आर्चबिशपने चार्ल्स यांना शपथ दिली. यानंतर त्यांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजा चार्ल्स यांनी सेंट एडवर्डचा मुकुट देण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.