आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्लिन/बँकॉक:थायलंडच्या राजाने श्वानाला दिला एअर चीफ मार्शलचा दर्जा; संतप्त जनता म्हणाली - देश डबघाईस, राजाचा जर्मनीत आराम

बर्लिन/बँकॉकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजे महा वजिरालाँगकॉर्नसाठी जर्मनीचे फाइव्ह स्टार हॉटेल बुक

थायलंडमध्ये सरकार आणि राजेशाहीविरुद्ध लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पण राजा महा वजिरालाँगकॉर्न यांचे तऱ्हेवाईक वर्तन थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. अलीकडेच त्यांनी आपले शाही पाळीव श्वान पूडल फू-फूला मरणोत्तर एअर चीफ मार्शलचा दर्जा दिला. त्याच्यासाठी वेगळी गादी आहे व त्यावर लाखो डॉलर खर्च केले जात आहेत. त्याला एअर चीफ मार्शलचा पोशाख परिधान केला जातो आणि खुद्द राजे त्याला सोबत डिनर टेबलवर बसवतात. दरम्यान, बुधवारी बँकॉकमध्ये मोठ्या संख्येने निदर्शक रस्त्यांवर उतरले. त्यांचा आरोप आहे की, नागरिक कोरोना व लॉकडाऊननंतरचा आर्थिक फटका सहन करत आहेत. दुसरीकडे राजे वजिरालाँगकॉर्न २० खासगी सैनिक, ४ पत्नी आणि नोकरांसह जर्मनीच्या एका लक्झरी हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहेत. तेथे त्यांच्यासाठी एक फाइव्ह स्टार हॉटेल बुक केले आहे. त्यासाठी जर्मनीत डिस्ट्रिक्ट कौन्सिलकडून विशेष मंजुरीही घेण्यात आली आहे.

२८ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक ६८ वर्षीय राजे वजिरालाँगकॉर्न यांचा कक्ष थायलंडहून मागवलेले सोने व चांदीच्या बहुमूल्य वस्तूंनी सजवले आहे. त्यांना राजनैतिक सूट असल्याने त्यांच्या कुठल्याही कामात जर्मन सरकार हस्तक्षेप करत नाही. राजाने ३५ वर्षीय माजी पत्नी सिननेतलाही जर्मनीत बोलावले आहे. सिनेनत आधी नर्स होती, ती नंतर थाई लष्करात हेलिकॉप्टर पायलट झाली. राजाने तिच्याशी लग्न केले होते, पण तीन महिन्यांतच कटाच्या आरोपावरून महाराणी पदवी काढून घेऊन कैद करण्यात आले होते.

राजे वजिरालाँगकॉर्न जीन्समध्ये दिसले, पाठ आणि हातावर काढले रंगीबेरंगी टॅटू
थायलंडचे राजे वजिरालाँगकॉर्न आणि महाराणी सुदिथा यांचा एक फोटो अलीकडेच जारी झाला आहे. त्यात सुथिदा टॉप, उंच टाचांचे बूट, एका हातात मोठी बॅग आणि दुसऱ्या हातात नवे पाळीव श्वान पूडल फू-फूसह दिसत आहेत. राजे जीन्स, सँडल व पाठ आणि हातावर काढलेल्या टॅटूसह दिसत आहेत.