आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा अपघात टळला:पतंगासोबत हवेत उडाली तीन वर्षींची चिमुकली, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतंगासोबत हवेत उडाली तीन वर्षींची चिमुकली, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताइवानमध्ये सुरू असलेल्या पतंग उत्सवात एक मोठा अपघात टळला आहे. पंतग उडवताना तीन वर्षांच्या मुलीच्या पायात पंतगाची शेपटी अडकल्याने पतंगासोबत मुलगीही हवेत उडाली. हवेत काही सेकंद उडाल्यानंतर लोकांनी तिला खाली उतरवले. सुदैवाने मुलीला कोणतीही इजा झालेली नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताइवानच्या सिंचु शहरात आंतरराष्ट्रीय पतंग उत्सव सुरू आहे. रविवारी एका मोठ्या पतंगाच्या शेपटीमध्ये मुलीचा पाय अडकला. पाहता-पाहता पतंगासोबत मुलगी हवेत उडाली. काही सेकंद हवेत उडाल्यानंतर पतंगासोबत मुलगी जमिनीवर आली. यादरम्यान लोकांनी तिला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser