आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापायाी चालणे किंवा फिरणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल की, समोर पाहत मागे चालत जाणे जास्त फायदेशीर असते. उलटे चालल्यामुळे ४०% हून अधिक उष्मांक जळतात. सहा महिन्यांपर्यंत उलट दिशेने चालल्यामुळे शरीरातील फॅटमध्ये घट होते.
आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या सिस्टिममधील समन्वयामुळे आपण चालू शकतो. आपण उलटे चालू लागतो तेव्हा मेंदूला या प्रणालीत ताळमेळ बसवण्यात जास्त वेळ आणि कष्ट पडतात. नुकत्याच केलेल्या अभ्यासात समोर आले की, मागच्या बाजून चालल्यामुळे शरीराचे स्थैर्य आणि संतुलन चांगले राहते. गुडघेदुखीची समस्या असणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होतो. उलट दिशेन चालल्याने आपण छोटी-छोटी पावले टाकतो.यामुळे पायाच्या सांध्यावर कमी ओझे पडते आणि पायाच्या खालील भागातील मांसपेशी बळकट होतात. शरीराचा कल बदलल्यास टाचदुखीत दिलासा मिळतो. उलटे चालल्याने मणकाच्या सहायक मांसपेशींना जास्त फायदा मिळतो. यामुळे पाठीखालील भागात होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. शरीराचे बिघडलेले संतुलन ठिक करण्यासाठी यामुळे मदत मिळते. उलटे पळल्यानेही आणखी जास्त फायदा होत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.
वजनाच्या १०% उलट दिशेने खेचल्यास वेग वाढतो तुम्ही जागेच्या कमतरतेमुळे धावू शकत नसाल तर उलट चालत वजन ओढल्याचा फायदा हाेतो. दुखापत कमी होते. उलटे धावल्याने अॅथलीट्सची कामगिरी चांगली होते. आपल्या शरीराचे १०% वजन उलट दिशेत खेचल्याने अॅथलिट्सचा वेग वाढतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.