आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौल्यवान हिऱ्याचा इतिहास:ब्रिटनमध्ये सामान्य लोकांनाही कोहिनूर पाहता येणार; टॉवर ऑफ लंडनमध्ये 26 मेपासून प्रदर्शन भरणार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉवर ऑफ लंडनमध्ये 'विजयाचे प्रतीक' म्हणून  कोहिनूर हिरा प्रदर्शित केला जाईल. - Divya Marathi
टॉवर ऑफ लंडनमध्ये 'विजयाचे प्रतीक' म्हणून कोहिनूर हिरा प्रदर्शित केला जाईल.

ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा टॉवर ऑफ लंडनमध्ये 'विजयाचे प्रतीक' म्हणून प्रदर्शित केला जाईल. 26 मे पासून ते लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. उर्वरित मुकुट दागिन्यांसह कोहिनूरचा देखील पर्दशनामध्ये समावेश असेल. कोहिनूर प्रदर्शित करण्यासोबतच त्याचा इतिहासही अनेक व्हिडिओ आणि प्रेझेंटेशनद्वारे सांगितला जाईल, असे ब्रिटनमधील पॅलेसचे व्यवस्थापन करणाऱ्या हिस्टोरिक रॉयल पॅलेसेस या धर्मादाय संस्थेने सांगितले.

कोहिनूरचा संपूर्ण प्रवास एकापेक्षा जास्त प्रॉप्स आणि व्हिडिओ वापरून केलेल्या सादरीकरणात दाखवला जाईल. मुघल सम्राट, इराणचे शाह, अफगाणिस्तानचे शासक आणि शीख महाराजा यांसारख्या पूर्वीच्या सर्व मालकांसाठी ते विजयाचे प्रतीक कसे होते हे देखील ते सांगेल.

या फोटोत राणी एलिझाबेथ कोहिनूर रत्नजडित मुकुट परिधान केलेल्या दिसत आहेत.
या फोटोत राणी एलिझाबेथ कोहिनूर रत्नजडित मुकुट परिधान केलेल्या दिसत आहेत.

राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकानंतर हे प्रदर्शन भरवण्यात येणार
टॉवर ऑफ लंडनचे गव्हर्नर अँड्र्यू जॅक्सन म्हणाले की, हे वर्ष आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. ब्रिटनचे नवे राजा चार्ल्स यांचा 6 मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. टॉवर ऑफ लंडन देखील यात आपली भूमिका बजावणार आहे. राज्याभिषेकानंतर लगेचच अनेक मौल्यवान मुकुट दागिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. या संग्रहाबद्दल लोकांना माहिती देणे हा आमचा उद्देश आहे.

कॅमिला कोहिनूर जडलेला मुकुट घालणार नाही
याआधी, ब्रिटनची नवीन राणी म्हणजेच राजा चार्ल्स-III ची पत्नी कॅमिला यांनी राज्याभिषेकादरम्यान राणी एलिझाबेथचा कोहिनूर जडलेला मुकुट न घालण्याची घोषणा केली होती. वास्तविक, राजघराण्याला भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर, कॅमिलासाठी क्वीन मेरीचा 100 वर्षांचा मुकुट तयार करण्याची चर्चा होती.

हा फोटो टॉवर ऑफ लंडनचे आहे, जो 1078 साली राजवाड्याच्या रूपात बांधण्यात आला होता. त्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.
हा फोटो टॉवर ऑफ लंडनचे आहे, जो 1078 साली राजवाड्याच्या रूपात बांधण्यात आला होता. त्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.
कोहिनूरसोबतच रॉयल हाऊसचे इतर दागिनेही टॉवरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.
कोहिनूरसोबतच रॉयल हाऊसचे इतर दागिनेही टॉवरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

भारताने अनेकदा परत मागितला कोहिनूर

भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेकदा दुरावा निर्माण झाला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याची मागणी करण्यात आली होती.

राणीचा मुकुट कोहिनूर आणि आफ्रिकेतील ग्रेट स्टारसह जगातील अनेक मौल्यवान हिरे आणि दागिन्यांनी जडलेला आहे. त्याची किंमत सुमारे 40 कोटी डॉलर एवढी आहे. भारताप्रमाणेच आफ्रिकेनेही ब्रिटनच्या शाही मुकुटात जडलेला आपला मौल्यवान हिरा परत करण्याची मागणी अनेकदा केली आहे.

किंग चार्ल्सचा राजा म्हणून 6 मे रोजी राज्याभिषेक होईल.
किंग चार्ल्सचा राजा म्हणून 6 मे रोजी राज्याभिषेक होईल.

अनेक देश करतात कोहिनूरवर आपला दावा

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास वादांनी भरलेला आहे. 1849 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला तेव्हा हा हिरा ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या हवाली करण्यात आला होता. नंतर तो इतर अनेक हिऱ्यांसह ब्रिटिश मुकुटात जडवण्यात आला. भारताशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही या हिऱ्यावर दावा केला आहे.

राजघराण्याच्या शानशौकीत वार्षिक 1,000 कोटींचा खर्च

एकीकडे संपूर्ण ब्रिटन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यग्र आहे. महाराणीच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले. दुसरीकडे, एक मोठा वर्ग असा आहे जो त्यांना 'नॉट माय किंग' म्हणत केवळ विरोधच करत नाहीये, तर संपूर्ण राजेशाही संपवण्याची मागणी करत आहे.

या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, ब्रिटनमधील राजेशाही संपुष्टात आणण्याची मागणी का वाढत आहे, याची मुख्य 5 कारणे कोणती... येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...