आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Korea | Suicide | The. Korea's Suneyung Rises To Suicide, The World's Toughest Nine hour Entrance Exam

दिव्य मराठी विशेष:द. कोरियात सुनेयुंगमुळे आत्महत्येत वाढ, नऊ तास चालणारी जगातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षा

वृत्तसंस्था । सेऊल15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण काेरियात सेऊलजवळील जाँगयेशा मंदिरात नाेव्हेंबरच्या काळात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मुलांच्या भविष्यासाठी आईवडील प्रार्थनेसाठी येथे आवर्जून येतात. कारण त्यांची लाडकी मुले-मुली जगातील सर्वात कठीण परीक्षेला बसल्याची चिंता त्यांना वाटते. सुनेयुंग परीक्षा नऊ तास चालते. ही परीक्षा नाेव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आयाेजित केली जाते.

या परीक्षेला दरवर्षी सुमारे पाच लाख मुले बसतात. ही परीक्षा उत्तीर्ण हाेण्याचे दक्षिण काेरियातील प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. संपूर्ण देशालाच जणू या परीक्षेची प्रतीक्षा लागलेली असते. परीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे एकप्रकारे आपल्या भविष्याची हमी आणि विवाहाची देखील खात्री मानली जाते. परंतु या कठीण परीक्षेबद्दल आता दक्षिण काेरियात प्रश्न उपस्थिती केले जात आहेत.

परीक्षेच्या स्वरूपाबाबतचे हे प्रश्न आहेत. परीक्षेचे स्वरूप सहज असले पाहिजे, असे पालकांना वाटते. कारण या परीक्षेचे महत्त्व खूप वाढल्याने त्यात उत्तीर्ण हाेण्याचा दबाव येऊन मुले मुला-मुलींमधील नैराश्याची समस्या वाढू लागली आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. विकसित देशांपैकी असलेल्या दक्षिण काेरियात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.

ही बाब बरेच काही सांगणारी आहे. चाेवीस वर्षांपर्यंतच्या तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण गेल्या पाच वर्षांच्या काळात दहा टक्क्यांनी वाढले आहे. सुनेयुंगमध्ये उत्तीर्ण हाेता आले नाही तर अनेक तरुण जीवनयात्रा संपवून टाकतात.

रेल्व-विमानांचे नवे वेळापत्रक, विलंब टाळण्यासाठी पाेलिस वाहनांचीही मदत
परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना विलंब हाेऊ नये म्हणून सेऊलमध्ये वाहतूक, रेल्वे एवढेच नव्हे तर विमानाच्या वेळाही बदलल्या जातात. सरकारी कार्यालये, बँ, स्टाॅक मार्केट तासाभरानंतर सुरू हाेतात. परीक्षा सकाळी पावणे नऊ वाजता सुरू हाेते. उशिर हाेऊ शकताे, असे वाटणाऱ्या मुलांसाठी पाेलिसांची वाहने, दुचाकीही सेवेत असतात. या वाहनात बसून मुले शाळेत जाऊ शकतात. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करताे, असे पाेलिस विभागाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...