आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका टळला नाही:जगात कोविड-19 मुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 50 लाखांच्या पार झाला, अनेक देशांमध्ये अजुनही कहर सुरुच

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात कोविड-19 मुळे मृतांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार 19 महिन्यांत 5 लाख मृत्यूंचा आकडा पूर्ण झाला. यावरून साथीच्या आजाराच्या गंभीरतेची कल्पना येते. वृत्तसंस्थेने काही तज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की वास्तविक मृतांची संख्या तिप्पट असू शकते.

अहवालानुसार- अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि ब्रिटनला या महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. 28 दिवसांत 1 लाख 97 हजार 116 बाधितांचा मृत्यू झाला. या दरम्यान 1 कोटी 17 लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

चीनमध्ये अजूनही कहर सुरुच
2019 च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मार्च 2020 मध्ये, त्याने संपूर्ण जगाला वेढले. विशेष म्हणजे चीन अद्याप या महामारीतून सावरलेला नाही. गेल्या काही दिवसांत हजारो प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

जगाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात अमेरिका, ब्रिटन, रशिया, तुर्की आणि युक्रेनमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. जगातील बहुतेक देशांमध्ये लसीकरण वेगाने सुरू आहे. अमेरिकेत आतापर्यंत7 लाख 45 हजार 836 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. येथे 4 लाख 58 हजार 437 लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्ये 2 लाख 35 हजार 318 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाची गती खूप वेगवान आहे
यूकेमध्ये आतापर्यंत 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सुमारे 80% लोकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. 86.9% लोक असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. येल विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ अल्बर्ट कू म्हणतात - अशा प्रकारची घटना आपल्या आयुष्यात एकदाच घडते. आपण स्वतःला सुरक्षित ठेवले तर बरे होईल.

बातम्या आणखी आहेत...