आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • KP Sharma Oli Update | Nepal Political Crisis PM Contenders Latest News Updates; Bamdev Gautam Vs Pushp Kamal Dahal Prachanda | Who Will Be The Next Prime Minister Of Nepal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळमध्ये सत्ता संकट:भारताविरोधी भूमिकेमुळे नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे पद संकटात; खुर्ची वाचवण्यासाठी नाराज नेत्यांच्या घरी, राजीनाम्यावर होऊ शकतो निर्णय

काठमांडू10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओलींचे पंतप्रधान पद धोक्यात, स्वतःचा पक्ष काढू शकतात केपी शर्मा ओली

भारताला विरोध करणे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना महागात पडल्याचे दिसून येत आहे. नेपाळची शनिवारची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या राजीनाम्यावर सुद्धा निर्णय होऊ शकतो. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एनसीपी) च्या स्थायी समितीतील 40 पैकी 33 नेते ओलींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सकाळपासूनच ओली नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत. तसेच मुख्य विरोधक पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याशी सुद्धा ओलींनी 3 तास त्यांच्या घरात चर्चा केली. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याप्रकरणी विरोधक आधीच आक्रमक होते. त्यात भारत आणि चीन वादात त्यांनी भारतावर एकानंतर एक गंभीर आरोप केले. एवढेच नव्हे, तर भारताकडून नेपाळ सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला तेव्हापासून परिस्थिती ओलींच्या आणखी विरोधात गेली. आता त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. सत्ताधारी एनसीपीच्या इतर युनिट्स सुद्धा सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. मीडिया रिपोर्टनुसार, त्या युनिट सुद्धा ओलींवर नाराज आहेत. यातील बड्या नेत्यांनी ओलींना पायउतार होण्याची मागणी केली. त्यांची मनधरणी करण्यासाठी ओली यातील नेत्यांच्या थेट घरी पोहोचले आहेत.

ओलींचे पद धोक्यात

नेपाळमध्ये सत्ताधारी एनसीपीच्या स्थायी समितीची आज बैठक होणार आहे. या समितीमध्ये असलेल्या 40 पैकी 33 नेत्यांनी आधीच ओलींच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे, ओलींसमोर मोठे संकट आहे. आजच्या बैठकीमध्ये ओलींच्या भवितव्याचा फैसला शक्य आहे. पक्षांतर्गत विरोधक आणि प्रतिस्पर्धी प्रचंड यांच्याशी पंतप्रधानांनी तीन तास चर्चा केली. यात काय मुद्दे मांडण्यात आले हे अद्याप समोर आलेले नाही. यासोबतच, प्रचंड यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, या पक्षाच्या स्थायी समितीची बैठक 7 दिवसांपासून रोज होत आहे. त्यातील केवळ 2 बैठकांमध्ये ओली सहभागी झाले होते. ते नेत्यांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना टाळत असल्याचे देखील सांगितले जात आहे.

नवीन पक्ष काढू शकतात ओली

ओली आपला नवीन पक्ष काढणार अशी देखील चर्चा आहे. त्यांनी नेपाळ कम्युनिस्ट पार्टी-यूएमएल नावाने नोंदणी सुद्धा केल्याीची चर्चा आहे. सत्ता संकटातही नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी काठमांडू येथील चिनी राजदूत होउ यानकी यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले आहे. त्या नेपाळमध्ये असलेल्या चीनच्या सर्वात मजबूत राजदूत मानल्या जातात. नेपाळच्या सत्ता संकटात तोडगा काढण्यासाठी त्यांची देखील मदत घेतली जाऊ शकते. यात त्या आधीच सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वीच नेपाळचे पंतप्रधान, त्यांचे स्पर्धक आणि महत्वाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...