आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Kulbhushan Jadhav Pakistan News Updates; Kulbhushan Jadhav Refused To File Review Petition Against Death Sentence

पाकिस्तान:कुलभूषण जाधव यांचा फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार-इम्रान सरकारचा दावा

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 29 मार्च 2016 ला कुलभूषण जाधव यांना बलूचिस्तानातून अटक झाली होती
  • एप्रिल 2017 मध्ये पाक न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली
  • 21 जुलै 2019 ला आयसीजेने जाधव यांच्या फाशीवर स्थिगिती लावली

पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कूलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानने अजब दावा केला आहे. यात म्हटले आहे की, फाशीपासून वाचण्यासाठी जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला. पाकिस्तानी मीडियानुसार, जाधव यांनी आपल्या पेडिंग दया याचिकेवर थाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, पाकिस्तानचे ॅडिशनल अटॉर्नी जनरल अहमद इरफानने बुधवारी साउथ एशिया डीजीसोबत झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान हा दावा केला आहे.

17 जूनला पाकिस्तानने दिले होते प्रपोजल

अॅडिशनल अटॉर्नी जनरलने सांगितले की, 17 जून 2020 ला कूलभूषण जाधव यांना त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण त्यांनी आपल्या कायदेशीर बाबींचा वापर करत असे करण्यास नकार दिला. त्यांना दुसरा कॉन्सुलर देण्याचा प्रस्तावदेखील देण्यात आला होता.

कुलभूषण यांना 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारताने अनेकवेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. 2017 मध्ये भारताने आयसीजेकडे हे प्रकरण सोपावले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. तेव्हापासून पाकिस्तानने यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

0