आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात कुवेतच्या फहील भागात मोठी निदर्शने झाली. यानंतर कुवेत सरकारने कठोर कारवाई करत पैगंबरांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या स्थलांतरित आंदोलकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या कुवेतमध्ये परतण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अटक का होत आहे?
कुवेतचे वृत्तपत्र 'अरब टाईम्स'ने दिलेल्या माहितीनुसार, फहील येथील स्थलांतरितांनी (कुवेतमध्ये राहणारे परदेशी) शुक्रवारच्या नमाजानंतर नुपूर शर्मांविरोधात जोरदार निदर्शने केली. यामुळे कुवेत सरकार नाराज झाले. हे कुवेती कायद्याचे थेट उल्लंघन मानले जात आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर झालेल्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणाने जोर पकडला आणि इस्लामिक देशांनी भारताचा निषेध केला. नूपूर शर्मांविरोधात आठवड्याभरापासून अनेक देशांमध्ये निदर्शने सुरू आहेत.
कुवेतसह 57 देशांमध्ये निदर्शने
57 मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (OIC) प्रथम या मुद्द्यावर विरोध केला आणि त्यानंतर काही अरब देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया, तुर्की, मलेशिया आणि पाकिस्तान या देशांनीही या वक्तव्याला विरोध केला आहे.
भारताने ओआयसीचे विधान फेटाळले
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या विधानावर आक्षेप घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- भारत ओआयसी सचिवालयाच्या अनावश्यक आणि छोट्या विचाराच्या टिप्पण्यांना स्पष्टपणे नाकारतो. भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करते.
कुवेतमध्ये 4.5 लाख भारतीय आहेत
ऐतिहासिकदृष्ट्या भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध अतिशय मजबूत राहिले आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग येथून आयात करतो. त्याचबरोबर कुवेतमध्ये काम करणाऱ्या एकूण भारतीयांची संख्या सुमारे साडेचार लाख आहे. कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या 75% प्रवासी आहेत, ज्यामध्ये बहुसंख्य भारतीय आहेत. यामुळे भारताला ५.५% परकीय चलन मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.