आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनची राजधानी कीव्हवर ताब्या मिळवण्यासाठी आतुर रशियन सैन्याला शनिवारी पलटवार सोसावा लागला. रशियन सैन्यासाठी हे अनपेक्षित होते. राजधानीच्या बाह्य वस्तीत संघर्ष नगन्य होता. कीव्हच्या आत स्थिती भिन्न आहे. येथे हजारो नागरिक हातात शस्त्र घेऊन लष्करी तुकड्यांत सहभागी झाले आहेत. बदलत्या स्थितीत रशियन लष्करी कमांडरसमोर नवे आव्हान उभे आहे. मात्र, युक्रेन जास्त काळ नागरिकांना ढाल करू शकणार नाही, असे रशियाने म्हटले आहे.
भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २ हजार भारतीय रोमानिया आणि पोलंडच्या सीमा क्षेत्रात पोहोचत आहेत. यात बहुतांश विद्यार्थी आहेत. एअर इंडियाचे विमान रोमानियातून २१९ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत आले. पोलंडहूनही भारतासाठी उड्डाणे सुरू होतील.
रणगाड्यासमाेर युक्रेनियन; म्हणाला, पुढे जाऊन दाखवा
कीव्हचे एक छायाचित्र १९८९ च्या चीनमधील एका घटनेची आठवण करून देते. तेव्हा एक नागरिक बीजिंगकडे सरसावणाऱ्या रणगाड्यांसमोर उभा राहिला होता. कीव्हमध्ये शनिवारी रशियन रणगाड्यांसमोर एक युक्रेनियन नागरिक आडवा आला आणि म्हणाला, पुढे जाऊन तर दाखवा. रशियन लष्कराने रणगाडा तेथे थांबवला. त्यानंतर त्याला हटवले. कीव्हमध्ये रशियन लष्कराला लोकांकडून मोठा विरोध होत आहे.
युक्रेनच्या राजधानीत संचारबंदी, खाण्यापिण्याची सामग्री संपतेय
कीव्हमध्ये लोक ३ दिवसांपासून अंडरग्राउंड रेल्वे मार्गावर बसले आहेत. खाण्यापिण्याची सामग्री संपत आहे. राजधानी कीव्हमध्ये संचारबंदी लागू आहे. लोक घरांत किंवा बंकरमध्ये आहेत. शेकडो तरुण आपापल्या भागांत शस्त्रसज्ज पहारा देत आहेत.
राजधानी कीव्हच्या ताब्यासाठी लढाई, लोकांचीही आघाडी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.