आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलांच्या अडचणी:लंच बॉक्समध्ये पोषणयुक्त आहार नसल्याने पालकांचे उद्बोधन, ब्रिटनच्या एक तृतीयांश मुलांच्या डब्यात साखर जास्त, फळेही नाही

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यात काय द्यावे आणि काय देऊ नये, हा प्रत्येक आईसाठी चिंतेचा विषय असतो. मुलांना बाजारातील जास्त तेलकट पदार्थ आवडतात, असे एका पाहणीतून दिसून आले आहे. परंतु अनेकदा असे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर नसल्याचे दिसून येते. इंग्लंडमध्ये शाळकरी मुलांच्या डब्यातील पदार्थांवर संशोधन केले. त्यानुसार प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांपैकी केवळ एका विद्यार्थ्याच्या डब्ब्यात पाैष्टीक पदार्थ होते. लीड्स विद्यापीठातील संशोधनानुसार एक तृतीयांश मुलांच्या लंचमध्ये साखरेचे प्रमाण जास्त होते. केवळ निम्म्या विद्यार्थ्यांच्या डब्ब्यात फळांचा समावेश होता. केवळ २० टक्के मुलांच्या डब्ब्यात हिरव्या पालेभाज्यांना स्थान होते. सँडविचसाठी पांढऱ्या ब्रेडचा वापर केला गेला होता. त्यात जॅम व चॉकलेट बार होते. केवळ १.६ टक्के मुलांचे लंच बॉक्स पोषणाच्या दृष्टीने योग्य होते. मुले दररोज सॉस रोल्ससारखे पदार्थ जास्त खातात. परंतु फळ,भाज्यांना महत्त्व देत नाहीत.

पौष्टिक भोजन केल्याने एकाग्रतेने अभ्यास
नॅशनल ओबेसिटी फोरमचे टॅम फ्राय म्हणाले, लहान मुलांनी जंक फूड ऐवजी पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास ते एकाग्रतेने अभ्यास करू शकतील. शाळेत शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या दीर्घकाळ स्मरणातही राहू शकतील. यातून त्यांचा संपूर्ण विकास होतो.

बातम्या आणखी आहेत...