आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​लादेनच्या कुटुंबाने ब्रिटीश राजपुत्राला दिले 10 कोटी:सर्व पैसा चॅरिटीसाठी वापरल्याचा आरोप, संस्थेने फेटाळले आरोप

लंडन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकलेत. यावेळी त्यांच्यावर त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टला कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेनच्या 2 चुलत भावांनी 1 दशलक्ष पौंड म्हणजे जवळपास 9.64 कोटी रुपये दिल्याचा आरोप झाला आहे. एका वृत्तानुसार, प्रिन्सच्या सल्लागारांनी त्यांना हा पैसा न घेण्याचा सल्ला दिला होता. पण चार्ल्स यांनी या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले.

काही महिन्यांपूर्वीच प्रिन्सही वादात अडकले होते. तेव्हाही त्यांच्यावर ब्रिटीश गुप्तहेर संघटनांच्या निशाण्यावर असणाऱ्या सौदीच्या 2 व्यक्तींकडून निधी स्विकारल्याचा आरोप झाला होता.

सल्ला का मानला नाही

ब्रिटनच्या ‘द संडे टाइम्स’च्या वृत्तानुसार, चार्ल्स यांनी लादेनच्या कुटुंबीयांकडून पैसे घेणे फार आश्चर्यकारक आहे. ज्या 2 जणआंनी चॅरिटीला फडं दिला, त्यांची नावे बकर बिन लादेन व शफीक आहेत. प्रिन्स यांच्या सल्लागारांनी त्यांना या दोघांकडून एक छदामही न घेण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करत हा पैसा स्वीकारला. हा पैसा 2013 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड (पीडब्ल्यूसीएफ) च्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला. पण प्रिन्स यांनी या पैशाचा वापर स्वतःसाठी केला नाही.

प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड (PWCF)1986 मध्ये स्थापन करण्यात आला होता.
प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड (PWCF)1986 मध्ये स्थापन करण्यात आला होता.

पोलिस चौकशीची टांगती तलवार

PWCF चे चेअरमन इयान हेशीर यांच्या माहितीनुसार, हा फंड घेण्यासाठी 5 विश्वस्त तयार होते. हा एकट्या चार्ल्स यांचा निर्णय नव्हता. आतापर्यंत चार्ल्स यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे प्रिन्स यांनी जेव्हा हा पैसा स्वीकारला त्यापूर्वी 2 वर्ष अगोदर अमेरिकन नेव्ही सील कमांडोंनी पाकच्या अबोटाबादेत लादेनला कंठस्नान घातले होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये लादेनचे पाळेमुळे शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यामुळे हे प्रकरण गरम असतानाही प्रिन्स यांनी हा फंड का स्वीकारला? त्यांना स्थितीची माहिती नव्हती काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काही वर्षांपूर्वी सौदीच्या 2 ब्लॅक लिस्टेड उद्योगपतींनीही चार्ल्स यांच्या चॅरिटी फाउंडेशनला अमाप निधी दिला होता. या प्रकरणी प्रकरणाचा खुलासाही संडे टाइम्सने केला होता. तपासानंतर ट्रस्टच्या तत्कालीन प्रमुखांनी राजीनामा दिला होता.

या दोन्ही उद्योगपतींनी ब्रिटनचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी हा पैसा दिला होता. पण चौकशीत सौदी उद्योजकांनी आपल्यावरील सर्वच आरोप फेटाळून लावले. ट्रस्टने स्वतः या प्रकरणाचा तपास करण्याची ग्वाही दिली होती. या प्रकरणी रशियन संबंधही उजेडात आले होते.

बातम्या आणखी आहेत...