आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॅन्सेटच्या संशोधनात दावा - देशांनी लॉकडाऊन उठवण्याची घाई केल्यास संसर्गाची प्रकरणे वाढतील

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • इशारा : लस तयार होईपर्यंत प्रतिबंधात कोणतीही सूट दिली जाऊ नये

कोरोनामुळे जगभरात १.१४ लाख जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे. अशात काही देशांनी लॉकडाऊन वाढवले आहे, तर काही देश ते उठवण्याच्या तयारीत आहेत. काही असेही देश आहेत, जेथे लाॅकडाऊन पूर्णपणे लागू न करता एखाद्या राज्य किंवा प्रांतापर्यंतच मर्यादित ठेवले आहे. लॅन्सेट जनरलच्या संशोधन अहवालात लॉकडाऊन उठवण्याचा विचार करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे की, लस येईपर्यंत लॉकडाऊन उठवू नये. त्यात म्हटले आहे की, कोणतीही तयारी न करता प्रतिबंध उठवणे म्हणजे नव्याने संसर्गाचा महापूर आणणे होईल. हा अहवाल चीनच्या संशोधकांनी देशातील नव्या प्रकरणांच्या आधारे तयार केला आहे.

अनेक देशांत लाॅकडाऊन यशस्वी, ७०% पर्यंत संसर्ग घटवण्यात आले यश

  • लॅन्सेटनुसार लॉकडाऊन नसल्यास एक बाधित व्यक्ती सरासरी तीन जणांना बाधित करेल. लॉकडाऊनमुळे या प्रमाणात ६०-७०% घट येत आहे.
  • संशोधनात म्हटले आहे की, आपण सोशल डिस्टन्सिंग संपवले तर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अन्य कोणता तरी उपाय करावा लागेल.
  • अनेक देशांत लाॅकडाऊनचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ७०%पेक्षा जास्त संसर्ग कमी करण्यात यश आले.
  • चीनच्या संशोधकांनुसार लॉकडाऊन हटवला तर संसर्गासाठी जास्त सावध राहावे लागेल आणि लस येईपर्यंत अनेक भागांत नियंत्रण करावे लागेल.
  • हाँगकाँगच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, चीनने काटेकोरपणे संसर्गाची पहिली लाट नियंत्रणात आणली. मात्र आता दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. हे चिंताजनक आहे.
  • डब्ल्यूएचओनेही म्हटले आहे की प्रतिबंध घाईने हटवल्यास परिणाम घातक होऊ शकतील.

लॉकडाऊन हटवले तर... 

चीनने नुकतेच वुहानमध्ये लाॅकडाऊन हटवले. चीनमध्ये संसर्गाची १०८ प्रकरणे आली. हुबेई प्रांतात दोन मृत्यू झाले. लंडन स्कूल आॅफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. अॅडम कुचार्सकी यांच्यानुसार लढाई दीर्घ चालेल.

लॉकडाऊन लावले तर... 

भारतात आरोग्य मंत्रालयाने म्हटले, देशात लॉकडाऊन नसते तर ८ लाखांपेक्षा जास्त बाधित असते. सध्या १० हजारांहून कमी आहेत.

बातम्या आणखी आहेत...