आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅन्सेटचा सर्व्हे:कोरोनाच्या दहशतीमुळे जगभरात लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले; तज्ज्ञांच्या मते - प्रभाव बराच काळ राहणार, उपचार-संशोधनाची गरज

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • व्यापाराची चिंता, नोकरी व बेघर होण्याच्या भीतीमुळे लोकांत नैराश्य

कोरोना विषाणूबाधेमुळे जगभरात प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. यादरम्यान जगभरात मानसिक आजार वाढतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असून याचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो, असे या तज्ज्ञांचे मत आहे. मानसिक आजारांवर उपचार करणारे न्यूरोसायंटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मते, या सर्व परिस्थितीचा लोकांच्या मनावर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून सर्वच देशांनी अशा लक्षणांवर आधारित उपचार तसेच संशोधनावर भर देण्याची गरज आहे. हे काम तातडीने सुरू व्हायला हवे. शिवाय अशा प्रकरणांची जागतिक पातळीवर निगराणी व्हावी, अशी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.  वास्तविक, ब्रिटनमधील लॅन्सेट सायकियाट्रीने मार्चच्या अखेरीस एक सर्वेक्षण केले होते. यात १,०९९ लोकांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांतून ही भीती समोर आली. लॉकडाऊन व आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे लोकांना आपला व्यापार बंद पडेल, नोकरी जाईल आणि बेघर होण्याची प्रचंड भीती वाटत आहे. ग्लास्गो विद्यापीठाचे प्रोफेसर रोरी ओकॉनर यांनी सांगितले की, दारू, नशा, जुगार, नात्यांत दुरावा आणि बेघर होण्याची भीती यामुळे लोकांना प्रचंड चिंता वाटत आहे. यातून निर्माण होणाऱ्या नैराश्याकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. संकटाच्या या काळात लोकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केले तर केवळ या लोकांचे जीवनच नव्हे, तर सर्व समाजावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. ज्या लोकांत गंभीर नैराश्य आहे अशांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या मनात आत्मघाती विचार येऊ शकतात. त्यावर तंत्रज्ञानातून निगराणी करण्याची गरज आहे. केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रो. एड बुलमोर म्हणाले, आपण यासाठी डिजिटल युगातील साधनांचा वापर करायला हवा. लोकांचे मानसिक स्वास्थ्य तपासण्यासाठी अधिक स्मार्ट उपाय शोधले पाहिजेत. 

देशात मानसिक आजाराने पीडितांची संख्या १५-२० टक्के वाढली

इंडियन सायकियाट्रिक सोसायटीच्या सर्व्हेनुसार, कोरोना महामारीनंतर देशात मानसिक रुग्णांची संख्या १५ ते २० टक्के वाढली आहे. विशेष म्हणजे, जगभरात असलेल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ १ टक्के कर्मचारीच मानसिक आजारांवरील उपचारांत कार्यरत आहेत. भारतात तर ही संख्या यापेक्षाही कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...