आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Land Slide In Myanmar | More Than 100 People Died And Many Injured In Landslide Accident In Myanmar Jade Mines

म्यानमारमध्ये भूस्खलन:मुसळधार पावसामुळे जेड खदानीत भूस्खलन, 110 मजुरांचा मृत्यू; अनेकजण ढिगाऱ्याकाळी दबल्याची माहिती

यंगून2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटना म्यानमारच्या कचिन राज्यात गुरुवारी सकाळी घडली
  • घटनेवेळी मजूर 250 फूट उंचीवर काम करत होते

म्यानमारच्या कचिन राज्यातील एका खदानीत मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी 8 वाजता भूस्खलन झाले. या घटनेत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही काही मजूर ढिगाऱ्याकाळी दबल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेवेळी मजूनर 250 फूट उंचीवर काम करत होते. पावसामुळे खदानीजवळ पाणी साचले होते. घटनेत काही मजुरांचा या पाण्यात बुडूनही मृत्यू झाला. वाई खार जिल्ह्याचे प्रशासक यू क्वॉ मिनने सांगितले की, 'या घटनेत कमीत-कमी 200 मजुरांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.' या परिसरात मागील एका आठवड्यापासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

मागच्या वर्षी भूस्खलनात 59 लोकांचा मृत्यू झाला

मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण-पूर्व म्यानमारमध्ये भूस्खलन झाले होते. यात 59 लोकांचा मृत्यू झाला होता. ती दुर्घटनाही पावसामुळेच झाली होती. त्यामुळे पूर आणि पावसामुळे 80 हजार लोक बेघर झाले होते.

हा फोटो मागच्या वर्षी झालेल्या भूस्खलनाचा आहे.
हा फोटो मागच्या वर्षी झालेल्या भूस्खलनाचा आहे.
बातम्या आणखी आहेत...