आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Landon | Baby Botox | Girls Take Botox Treatment In Their Fifties So That Wrinkles Do Not Appear On Their Face; Of Old Age

दिव्य मराठी विशेष:पन्नाशीत चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत म्हणून मुली पंचविशीतच घेताहेत बोटॉक्स ट्रीटमेंट, ‘बेबी बोटॉक्स’ उपचारांवर तरुण मुली करताहेत लाखोंचा खर्च; डॉक्टरांचा इशारा

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमधील ३० वर्षीय स्टिना सँडर्सला चार महिन्यांपूर्वी कपाळावर सुरकुत्या उमटल्याचे जाणवले. स्टिना म्हणाली की, वाढते वय स्वीकारणे किंवा नाकारणे हाच पर्याय माझ्याकडे होता. या सुरकुत्या मिटवण्याचा निश्चय मी केला. मानसोपचार तज्ज्ञ असलेली स्टिना दर तीन ते चार महिन्यांनी रिंकल्स रिलॅक्सिंग इंजेक्शन (बोटॉक्स) घेते. एका डोळ्याजवळील ट्रीटमेंटचा खर्च सुमारे १५ हजार रुपये आहे. नातेवाईक आणि डॉक्टरांनी रोखल्यानंतरही तिने ही ट्रीटमेंट सुरू ठेवली.

स्टिनासारख्या शेकडो मुली आता २५-३० या वयात चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत असा प्रयत्न करत आहेत. सौंदर्यतज्ज्ञ अॅना सेकिनाइट यांनी सांगितले की, पन्नाशीपर्यंत या ट्रीटमेंटची गरज नाही, असे लोकांना वाटते, पण त्या वयात देखभाल सुरू केल्यावर अपेक्षेनुसार परिणाम मिळत नाही. त्यामुळे ‘बेबी बोटॉक्स’ या लहान डोसचा ट्रेंड सुरू झाला. पंचविशीत सुरुवात केल्यास सुरकुत्या रोखता येतात. २५ ते ३० या वयात बोटॉक्स ही ट्रीटमेंट घेणाऱ्या मुलींची संख्या वेगाने वाढत आहे. दोन मुलांची आई असलेल्या केट थॉम्पसन यांनी त्यावर ५ लाख रुपये खर्च केले आहेत.

कॅरोलिना कोटलोव्स्काने (२८) अलीकडेच ट्रीटमेंट सुरू केली आहे. त्या म्हणाल्या, ‘या निर्णयात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मोठी भूमिका आहे. सेल्फी संस्कृतीत स्वत:ला उत्तमपणे सादर करणे महत्त्वाचे आहे. आधी फोटो पोस्ट करण्यापूर्वी मी खूप मेकअप करत असे, पण आता त्याची गरज नाही.’ तथापि, काही डॉक्टरांच्या मते, याच्या जास्त वापरामुळे चेहऱ्याची त्वचा पातळ होणे आणि आकार बदलण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

वर्षभरात ७०% वाढली बोटॉक्ससाठीची चौकशी, त्यात मुलींची संख्या जास्त

बोटॉक्स चेहऱ्याच्या स्नायूंच्या पृष्ठभागावर लावले जाते. त्यामुळे स्नायूंना विश्रांती मिळते आणि त्यांचे आकुंचन पावणे रोखले जाते. त्वचा तज्ज्ञ जॉन्क्विल चेंट्रे यांच्या मते, आधीपासून असलेल्या आणि खोल सुरकुत्या मिटवण्यासाठी बोटॉक्स उपयुक्त नाही. त्यामुळे ही ट्रीटमेंट लवकर घेण्याचा सल्ला दिला जातो. हा अवधी फ्रीजिंग टाइम मानला जातो. लवकर ट्रीटमेंट घेतल्यास फायदा मिळतो. ब्रिटिश असोसिएशन ऑफ अॅस्थेटिक्स प्लास्टिक सर्जन्सनुसार, गेल्या वर्षभरात बोटॉक्ससाठीची चौकशी ७०% वाढली आहे. त्यात मुलींची संख्या मोठी आहे.

बातम्या आणखी आहेत...