आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढते पर्यटन:दुबईत गेल्या वर्षी आले सर्वात जास्त 9 लाख भारतीय पर्यटक, वर्षभरात आले 72 लाखांवर प्रवासी

दुबई / शानीर एन सिद्दिकी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लॉकडाऊननंतर दुबईत पर्यटकांची ये-जा वाढली. दुबईने २०२१ मध्ये ७२ लाखांहून अधिक ओव्हरनाइट पर्यटकांचे स्वागत केले. यात दुबईत येणाऱ्या सुमारे ९ लाख पर्यटकांमध्ये भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. ते मागील वर्षीच्या तुलनेत ५.३ टक्के जास्त आहे. हे आकडे जागतिक पर्यटन सुधारणेसाठी चांगले संकेत मानले जात आहेत. दुबईतील पर्यटक संख्येत ३२ टक्के वाढ झाली आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३४ लाख होती. २०२१ मध्ये दुबईतील हॉटेलांच्या खोल्यांची मागणी लंडन, पॅरिस आणि ओस्लोतील संयुक्त हॉटेलच्या खोल्यांच्या मागणीच्या बरोबरीने आहे. २०२१ मध्ये सरासरी हॉटेल ऑक्युपन्सी ६७% पर्यंत पोहोचली होती, जी आंतरराष्ट्रीय स्तराच्या सर्वोच्च ऑक्युपन्सी संख्येपैकी एक आहे.

दुंबईला ट्रिप अॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स चॉइस अवॉर्ड््स २०२२ प्रदान करण्यात आला आहे. दुबईची अर्थव्यवस्था आणि पर्यटन विभागाचे महासंचालक हिलाल सईद अल मर्री म्हणाले की, दुबई जगातील सर्वात चांगले शहर म्हणून पुढे येत आहे. एक्स्पो २०२० दुबई आणि यूएई सुवर्ण जयंती समारंभामुळेही याला मोठी चालना मिळाली आहे.

दुबईत मागील वर्षी सौदी अरबहून ४,९१,००० प्रवासी, रशियातून ४,४४,०० आणि इंग्लंडहून ४,२०,००० पर्यटक आले. हा पश्चिम युरोपच्या प्रवाशांचा २२ टक्के भाग होता. दक्षिण आशियाने १८ टक्के योगदान दिले. १ ऑक्टोबर २०२१ रोजी एक्स्पो २०२० दुबईच्या उद्घाटनाने शहराच्या पर्यटन उद्योगात एका नव्या युगाची सुरुवात झाली आह. दुबई प्रेझेंट अभियान सुरू केले. या अभियानाने प्रेक्षकांसाठी २५ भाषांत ३,५०० हून जास्त ब्रॉडकास्ट स्रोतांवर प्रसारण केले.

दुबईने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षीय बहुप्रवेश व्हिसासोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त पर्यायही दिले आहेत. दुबईच्या वतीने या घोषणांमध्ये गुंतवणूकदार, उद्योजक आणि विशिष्ट प्रतिभांना लक्ष्य करणारी गोल्डन व्हिसा योजना आणि दुबई व्हर्च्युअल वर्किंगसह अन्य रिटायरमेंट सुविधा देऊ केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...