आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक-ट्रम्प यांच्यात पुन्हा संघर्ष:फेसबुक म्हणाले- जर ट्रम्प यांनी द्वेषपूर्ण भाषण किंवा चुकीची माहिती पोस्ट केली तर ती डिलीट करुन टाकू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वोर्टसला योग्य माहिती देण्यासाठी फेसबुकने 'वोटिंग इन्फार्मेशन सेंटर'ही सुरू केले आहे
  • अमेरिकेमध्ये 2016 मध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये फेसबुकवर हस्तक्षेप करण्याचे अनेक आरोप लावण्यात आले होते

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका पाहता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना फेसबुकने थेट चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी कंपनीचे मानके तोडल्यास प्लॅटफॉर्म त्यांची पोस्ट काढून टाकेल असे फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सँडबर्ग यांनी सांगितले. मंगळवारी एमएसएनबीसीशी बोलताना सँडबर्ग म्हणाल्या की जर अध्यक्ष द्वेषयुक्त भाषण किंवा कोरोनाबद्दल कोणतीही चुकीची माहिती पोस्ट करीत असतील तर ते हटवले जातील.

2016 मध्ये फेसबुकवर लावण्यात आले होते अनेक आरोप
अमेरिकेमध्ये 2016 मध्ये झालेल्या निवडणुकींच्या काळात फेसबुक अनेक आरोप लावण्यात आले होते. फेसबुकच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये परदेशी सैन्याने हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता फेसबुक कठोर पावले उचलत आहे. निवडणुकांच्या बाबतीत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी फेसबुकने गेल्या आठवड्यात 'वोटिंग इन्फार्मेशन सेंटर' सुरू केले आहे. या माध्यमातून अमेरिकेतील लोकांना वोटिंगविषयी योग्य माहिती मिळेल. कंपनीनुसार हे सेंटर फेसबुकसोबतच इंस्टग्रामवरही उपलब्ध आहे.

बॉयकॉटनंतर बदलला नियम
ट्रम्प यांच्या पोस्टवर अॅशन न घेतल्याने आणि कंपनीच्या सैल वागण्यामुळे जाहीराती देणाऱ्या 400 लोकांनी फेसबुकला बॉयकॉट केले होते. कंपनीचे कर्मचारीही या विरोधात आवाज उठवायला लागले होते. यानंतर कंपनीने हेट स्पीच आणि चुकीच्या बातम्यावर अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या हस्तक्षेपाला सामोरे जाण्यासाठी जगातील काही प्रगत यंत्रणा तयार केल्या आहेत आणि त्या सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

सध्याच्या काळात फेसबुक भारतातही वादात आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, हे सत्ताधारी पार्टी भाजपचे समर्थन करते.

बातम्या आणखी आहेत...