आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • International
 • Latest Russia Vaccine EpiVacCorona Update Second Covid Vaccine Is Being Released By Russia Which 'avoids Side Effects Of The First One' And Officials Hope It Will Be Ready By November

व्हॅक्सीनची मोठी अपडेट:रशिया आणखी एक व्हॅक्सीन EpiVacCorona लॉन्च करण्याच्या तयारीत, सप्टेंबरमध्ये ट्रायल पूर्ण होण्याची आशा आणि अक्टोबरमध्ये प्रोडक्शनची तयारी

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • व्हॅक्सीन EpiVacCorona ची पहिली ट्रायल 57 वॉलंटियर्सवर झाली, आतापर्यंत कोणतेही साइड इफेक्ट न दिसल्याचा दावा
 • हे सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांट आणि व्हॅक्टर रिसर्च सेंटरने मिळून तयार केले

रशिया लवकरच आपली आणखी एक व्हॅक्सिन लॉन्च करणार आहे. दावा आहे की, पहिली व्हॅक्सीन लावण्यानंतर लोकांमध्ये जे साइड इफेक्ट दिसले होते. नवीन व्हॅक्सीनच्या डोजमध्ये असे होणार नाही. व्हॅक्सीनमध्ये ज्या औषधांचा वापर करण्यात आला आहे ते रशियाच्या टॉप सीक्रेट प्लांटमधून मागवण्यात आले आहे. ड्रग सायबेरियाच्या सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांटमधून मागवण्यात आल्या आहेत.

व्हॅक्सीनचे नाव EpiVacCorona असे ठेवण्यात आले आहे. याचे ट्रायल सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. नुकतेच रशियाने जगातील पहिली कोविड-19 व्हॅक्सीन 'स्पुतनिक-वी' लॉन्च केली. हे रशियाचे संरक्षण मंत्रालय आणि गामालेया रिसर्च सेंटरने तयार केले होते. ही व्हॅक्सीन खूप वादात सापडली होती.

दावा - कोणतेही साइड इफेक्ट दिसले नाही
रशियाची दूसरी व्हॅक्सीन EpiVacCorona चे पहिले ट्रायल 57 वॉलंटियर्सवर करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, वॉलंटियर्सला 23 दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ट्रालयदरम्यान त्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या ट्रायलमध्ये कोणतेही साइडइफेक्ट दिसलेले नाहीत.

अक्टोबरमध्ये रजिस्ट्रेशन आणि नोव्हेंबरमध्ये प्रोडक्शनची तयारी
व्हॅक्सीनचे लक्ष्य इम्यून रेस्पॉन्स पाहणे हे होते. यासाठी 14 ते 21 दिवसांमध्ये वॉलंटियर्सला व्हॅक्सीनचा डोज दिला गेला. रशियाला आशा आहे की, व्हॅक्सीन अक्टोबरपर्यंत रजिस्टर्ड करण्यात येईल आणि नोव्हेंबरमध्ये याचे प्रोडक्शन सुरू होईल.

या व्हॅक्सीनला व्हॅक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजीसोबत मिळून तयार करण्यात आले आहे. जगातील ज्या दोन प्रमुख संस्थांकडे चिकनपॉक्सच्या व्हॅक्सीनचा सर्वात मोठा स्टॉक आहे. त्यामधील हे एक संस्थान आहे. तर दूसरे संस्थान हे अमेरिकेत आहे.

कोरेनाच्या 13 व्हॅक्सिनवर केले काम
सोवियत बायोलॉजिकल वेपंस रिसर्च प्लांट आणि व्हॅक्टर रिसर्च सेंटरने मिळून आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या 13 व्हॅक्सीनवर काम केले आहे. याची टेस्टिंग जनावरांवर करण्यात आली होती. व्हॅक्टर रिसर्च सेंटरसोबत मिळून औद्योगित स्तरावर स्मॉलपॉक्सची लस बनवण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये याच संस्थानासोबत मिळून रुसने ब्यूबोनिक प्लेग, इबोला, हेपेटाइटिस-बी, एचआयव्ही, सार्स आणि कँसरचा अँटीडोज तयार केला होता.

रशियाची पहिली व्हॅक्सीन 'स्पुतनिक-वी' चे 5 मोठे वाद
रशियाने जगातील पहिली कोविड-19 व्हॅक्सिनचे रजिस्ट्रेशन 11 ऑगस्टला करुन घेतले होते. हे खूप वादात सापडले होते. कारण तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्यापूर्वीच ही लस लॉन्च करण्यात आली होती. ही प्रचंड वादात सापडली होती.

 • पहिला : रशियाची पहिली व्हॅक्सीन 'स्पुतनिक-वी'च्या पहिला ते तिसऱ्या टप्प्याची माहिती आणि विस्तृत आकडा जारी करण्यात आला नव्हता.
 • दूसरा : ट्रायलदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइनचे पालन करण्यात आले नव्हते. WHO ने व्हॅक्सिनला धोकादायक म्हटले होते.
 • तीसरा: रशियाने दावा केला की, ज्यांना लस देण्यात आली त्यांना कोणतेही साइडइफेक्ट दिसले नाही. तर रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार व्हॅक्सीन केवळ 38 वॉलंटियर्सला देण्यात आली. यामध्ये 144 प्रकारचे साइड इफेक्ट दिसले.
 • चौथे : वालंटियर्समध्ये ताप, शरीरात वेदना, शहीराचे तापमान वाढणे, जिथे इंजेक्शन देण्यात आले तिथे खाज येणे आणि सूज येण्यासारखे साइड इफेक्ट दिसले. याव्यतिरिक्त शरीरात एनर्जी नसल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, डोकेदुखी, डायरिया, घश्यावर सूज, नाक वाहणे यांसारखे साइड इफेक्ट कॉमन होते.
 • पाचवा : रशियाचे सरकार आणि व्हॅक्सीन तयार करणाऱ्या संस्थानने वेगवेगळे वक्तव्य दिले आहे. सरकारने म्हटले - ट्रायलमध्ये कोणतेही साइड इफेक्ट दिसले नाहीत. तर व्हॅक्सीन तयार करणाऱ्या गामालेया नॅशनल रिसर्च सेंटरने म्हटले की, ताप येऊ शकतो, मात्र हा ताप पॅरासिटामॉलची टॅबलेट देऊन बरा केला जाऊ शकतो.