आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Launched For Tourists On The Island Of Madeira In Portugal, A Record One Million Tourists Visited Here\ Marathi News

दोन वर्षांनंतर निर्बंध हटले:पोर्तुगालमधील मदिरा बेट पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले, येथे विक्रमी एक लाख पर्यटकांनी दिली भेट

लिस्बेन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पोर्तुगालमधील मदिरा बेट पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात येथे विक्रमी एक लाख पर्यटकांनी भेट दिली. युरोपच्या शेनजेंग रेटिंगमध्ये हे पर्यटनस्थळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक वारसास्थळ यादीतही याचा समावेश आहे. हे बेट आफ्रिकेपासून ५०० किमी व युरोपीय खंडापासून १ हजार किमीवर अटलांटिक महासागरात वसलेले आहे. लिस्बेन शहरापासून ९० मिनिटांचा हवाई प्रवास करून तेथे पाेहोचता येते. वसंतात येथील निसर्गाचे सौंदर्य खुलते. येथे लेवाडा कालवा आहे. ते मदिरा बेटावर आढळून येताे. येथे ९ किलोमीटरचा सागरी किनारा आहे. त्याशिवाय रम्य अशी रेताळ अशी जमिनही आकर्षित करते.

१९४९ मध्ये पोर्तुगाली नाविकांनी शोधले
पोर्तुगालचे नाविक वाज टेइक्सेरा, बार्टोलोमू पेरेस्ट्रेलो व जोआे गोंकोलेव्ह्स जर्कोने १४१९ मध्ये हे बेट शोधून काढले होते. येथे हजारो वर्षांची संस्कृती आहे. आतिथ्यही आहे. विविध हॉटेल आहेत. ग्रामीण पर्यटनाला चांगली चालना मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची पर्वणी पर्यटकांनी मिळते.

बातम्या आणखी आहेत...