आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Leaders Of Rich Countries, Including The United States, Abandon Issues Of Economic Development; Due To This, The Country Is Becoming Weak, People Are Suffering

निवडणूक जाहीरनामा:अमेरिकेसह श्रीमंत देशांचे नेते आर्थिक विकासाचे मुद्दे सोडताहेत; यामुळे देश कमकुवत होताेय, लोक त्रस्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेपासून ब्रिटन, चीन, रशिया,आशियापर्यंत आर्थिकदृष्ट्या विकसित देश आता मागे पडत आहेत. लोक त्रस्त आहेत आणि देशाची आर्थिक प्रगती एकतर रखडली आहे किंवा विकास दर घटत आहे. राजकीय नेते हे त्याचे कारण आहे.या देशांचे नेते ज्या आर्थिक विकासाच्या बाता मारून सत्तेत आले,त्यांनी आता देशाला आर्थिक संकटात ढकलले आहे. व्लादिमीर पुतीन यांनी रशियाला युद्धाच्या खाईत लोटले. अमेरिकेत जो बायडेन आर्थिक मंदीबाबत बोलत आहेत. चीनमध्ये शी जिनपिंग यांचे राष्ट्राच्या नावाखाली प्रशासन इतके निरंकुश झाले की, लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना विरोध होत आहे आणि शी जिनपिंग हा विरोध दाबण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जात आहेत. दुसरीकडे, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस या पॅटर्नमध्येच फिट बसतात.

आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर त्या पंतप्रधान झाल्या,मात्र महागाई रोखण्यात यशस्वी ठरल्या नाहीत. अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४% वार्षिक वृद्धीचे आश्वासन दिले. मात्र, जागतिक व्यापार प्रणाली कमकुवत करून दीर्घकालीन समृद्धीत अडथळा निर्माण केला. अमेरिकेच्या सरकारने गेल्या वर्षी १२००० नवे नियम सादर केले. राजकीय नेत्यांनी निवडणूक जाहीरनामा आधीच्या तुलनेत विकास दरावर केंद्रीत केला आहे.

१९८० नंतर विकासविरोधी भावना जवळपास ६०% वाढली आहे. विकासाच्या पायाभूत आराखडा किंवा लहान मुलांच्या विकासावर गुंतवणूक करण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन आणि देखभालीवर केंद्रीत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...