आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:वडिलांच्या सांगण्यावरून कायद्याचे शिक्षण घेतले, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 16 वर्षे न्यायालयात लढले

ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशची शगुफ्ता तबस्सुम व्यवसायाने वकील आहे. तिने १६ वर्षे दीर्घ न्यायालयीन लढा देत आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात पाठवले. शगुफ्ताला कधीच वकील व्हायचे नव्हते, परंतु वडिलांच्या सांगण्यावरून तिने कायद्याचे शिक्षण घेतले. ती सांगते, ‘वडील डॉ. ताहिर अहमद बांगलादेशच्या राजशाही जिल्हा विद्यापीठात प्राध्यापक होते. कुटुंब विद्यापीठाकडून मिळालेल्या क्वॉर्टरमध्ये राहत होते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी आईवडिलांच्या सांगण्यावरून कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ढाक्याला गेले. हत्येच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजे २००६ मध्ये वडील ढाक्याला आले व कुटुंबीयांना भेटून परत गेले. ही भेट त्यांचे सहकारी डॉ. मोहंमद मोहिउद्दीन यांच्याशी संबंधित होती. मोहिउद्दीन वडिलांचे मित्र होते. तथापि, वडिलांनी त्यांना साहित्याची चोरी करताना पकडले तेव्हा त्यांच्या मैत्रीत कटुता आली. २ फेब्रुवारीला मी वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलले नाही. त्यानंतर वडिलांचा मृतदेह विद्यापीठाच्या बागेतील सेप्टिक टँकमध्ये सापडल्याचे वृत्त ३ फेब्रुवारीला समोर आले. प्रकरणाची चौकशी झाली. त्यात डॉ. मोहिउद्दीन यांनीच ३ लोकांसोबत मिळून ही हत्या केल्याचे उघडकीस आले. २००८ मध्ये खालच्या कोर्टाने ४ जणांना दोषी ठरवले व मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, हायकोर्टाने मोहिउद्दीनला २०११ मध्ये निर्दोष ठरवले. त्यानंतर मी त्यांना शिक्षा होईपर्यंत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला.’

कुटुंबीयांच्या हत्येचा खटला चालवणाऱ्या वकिलांची मदत
शगुफ्ताच्या वडिलांचे खुनी मोहिउद्दीन हे श्रीमंत कुटुंबातील होते. त्यांचा मेहुणा बांगलादेशचा एक प्रभावशाली नेता होता. यामुळे त्यांना शिक्षा मिळवून देणे सोपे काम नव्हते. ५ एप्रिल २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने मोहिउद्दीन यांची मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. यानंतर शगुफ्ताने आपल्या कुटुंबीयांच्या हत्येची केस लढणाऱ्या वकिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...