आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Leave The Idea Of Getting Srinagar, Save Muzaffarabad; Pakistani Leader Targets Imran Khan Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:श्रीनगर मिळवायचा विचार सोडा, मुजफ्फराबाद वाचवले तरी पुष्कळ; पाकिस्तानातील नेत्याचा इमरान खान सरकारवर निशाणा

पेशावर/ इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर येथील एका कार्यक्रमात बोलताना मौलाना फजलूर.
  • पाकिस्तानच्या पंजाबमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप; संघटनांचा विरोध

पाकिस्तानात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (एफ) अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांनी काश्मीरवरून इम्रान खान सरकारवर निशाणा साधला आहे. इम्रान सरकारचा काश्मीरवर काहीही परिणाम दिसून येत नाही. भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. परंतु, पाक सरकार काहीही करू शकले नाही. भारताकडून श्रीनगर मिळवू, असे आम्हाला पूर्वी वाटे. मात्र, आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे, असा प्रश्न आपल्याला पडतो, असे रहमान यांनी पेशावर येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे. रहमान म्हणाले, पाकिस्तानात हुकूमशाही सुरू आहे. आम्ही त्याविरोधात लढत राहू. दुसरीकडे पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ म्हणाले, आमचा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका निभावेल. फजलूर यांच्यासोबत येऊन इम्रान सरकारच्या विरोधात कडक अजेंडा तयार करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप; संघटनांचा विरोध

पाकिस्तानातील पंजाबच्या विधानसभेत पारित ‘तहफ्फज-ए-बुनियाद ए इस्लाम’ विधेयकावरून वादंग निर्माण झाले आहे. त्यात ईशनिंदा प्रकरणात ५ वर्षांपर्यंतची शिक्षा व २.२५ लाख रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. प्रकाशकांना पुस्तकांची प्रत सरकारकडे जमा करावी लागेल. हे विधेयक पाकिस्तान संविधानाच्या विरोेधात असल्याचा दावा मानवी हक्क आयोगाने केला आहे. तसे झाल्यास देशात धार्मिक सहिष्णुता व स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही. पंजाबच्या शिक्षण मंडळाने अलीकडे १०० हून जास्त पुस्तकांना देशविरोधी व धर्मविरोधी असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली होती. सरकारने सातत्याने अशा पद्धतीची कारवाई केली आहे.

सौदीतही फजिती : पाकिस्तान सैन्य प्रमुखांना क्राऊन प्रिन्स यांनी टाळले

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचे वक्तव्य पाकिस्तान सरकारला जड जात आहे. रियाधमध्ये दाखल झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांना भेटण्यास सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर सौदी सरकारने रियाधमध्ये बाजवा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमही रद्द केले. बाजवा यांनी त्यांना भेटीसाठी अनेकदा वेळ मागितली. परंतु, सलमान व्यग्र असल्याचे उत्तर त्यांना एेकून घ्यावे लागले. त्यानंतर बाजवा यांनी सौदीचे लष्कर प्रमुख फैयाद बिन हामिद अल-रूवैली यांची भेट घेतली. त्यातही गंभीर मुद्यांवर चर्चा झाली नाही. त्यामुळे बाजवा यांना रिक्त हाताने परतावे लागले. इस्लामिक राष्ट्र संघटनेने काश्मीर मुद्यावरून भारताच्या विरोधात उभे राहू नये यासाठी सौदी काम करत आहे.