आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बैरुत स्फोटाचा परिणाम:लेबनानच्या पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला राजीनामा, स्फोट झाल्यापासून लोक सरकारविरोधात करत होते निदर्शने

बैरुतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीनुसार, येथील मृतांची संख्या 200 तर जखमींची संख्या 7 हजारांपेक्षा जास्त आहे
  • लोकांची मागणी - मंत्री किंवा खासदार नव्हे तर संपूर्ण सरकारने राजीनामा द्यावा, कारण ते देशाला वाचवू शकत नाहीत

लेबनानची राजधानी बैरूत येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर आठवड्याभरात (4 ऑगस्ट) पंतप्रधानांसह संपूर्ण सरकारने राजीनामा दिला. स्वत: पंतप्रधान हसन डायब यांनी सोमवारी संध्याकाळी देशाला केलेल्या संबोधनात ही घोषणा केली. स्फोट झाल्यापासून देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरूच होते. लोकांनी सरकारच्या राजीनाम्याची घोषणा करत होते. सोमवारी संध्याकाळी लोकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर देखील प्रदर्शन केले. याआधी चार मंत्र्यांना राजीनामा दिला आहे.

सोमवारी न्यायमंत्री मॅरी क्लाउड नजम आणि आर्थिक मंत्री गाझी वजनी यांनी राजीनामा दिला. तर रविवारी पर्यावरण मंत्री दामियनोस कत्तर आणि माहिती मंत्री मनल अब्दल समद यांनी सरकारमधून राजीनामा दिला होता. सरकार देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यास अपयशी ठरले असून स्फोटानंतरही गंभीर नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

निदर्शकांना दूर करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
निदर्शकांना दूर करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

सुमारे 14 हजार लोकांनी केले आंदोलन

सरकारविरोधात आंदोलन करत रविवारी बेरूत येथील संसदेजवळ लोकांनी रास्ता रोको केला होता. येथील शहीद चौकाजवळ सुमारे 10 हजार लोक जमा झाले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. निदर्शकांना दूर करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

रविवारी बेरूतमधील शहीद चौकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
रविवारी बेरूतमधील शहीद चौकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

निदर्शनात 170 लोक जखमी

काही आंदोलकांनी मंत्रालये आणि सरकारी बॅँकांचीही तोडफोड केली. रेडक्रॉसने सांगितले की, यावेळी एका पोलिसाचा मृत्यू झाला तर 170 हून अधिक लोक जखमी झाले. एका आंदोलकाने सांगितले की, आम्ही या नेत्यांना लोकांची मदत करण्यासाठी अनेक संधी दिल्या, पण ते अयशस्वी ठरले. यामुळे सरकारने राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. विशेषत: हिज्बुल्लाह यांनी राजीनामा द्यावा, कारण ते एक सैन्य दल आहे आणि केवळ लोकांना आपल्या शस्त्रांची भीती दाखवतात.

संपूर्ण सरकारने राजीनामा द्यावा

लोक संपूर्ण सरकारकडे राजीनामा देण्याची मागणी करत होते. देशाचे शीर्ष ख्रिश्चन मॅरोनाइट चर्चचे मुख्य धर्मोपदेशक, बेकर बोट्रोस अल-राय म्हणाले की मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, कारण ते त्यांच्या कारभाराचा मार्ग बदलू शकत नाही. एका खासदार किंवा मंत्र्यांचा राजीनामा पुरेसा नाही. संपूर्ण सरकारने राजीनामा द्यावा. ते देशाला वाचवण्यास असमर्थ आहेत.

शोध आणि बचाव मोहीम बंद

बीबीसीच्या रिपोर्ट्स नुसार, या स्फोटातील मृतांची संख्या 200 झाली आहे. अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. त्यातील अनेक परदेशी नागरिक आहेत. तर जखमींची संख्या 7 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दरम्यान, या स्फोटांचे केंद्र बनलेल्या बंदरावर सैन्याने आपले शोध व बचावकार्य बंद केले आहे.

0