आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जकार्ता:इंडोनेशियात कबर खोदणारे कमी; मास्क न लावणाऱ्यांना शिक्षा दिली- कोरोनाने मेलेल्या लोकांसाठी कबर खोदा

जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्व जावा प्रांतात गेल्या आठवड्यात 300 जणांना सुनावण्यात आली ही अनोखी शिक्षा

कोरोना काळात भारतात मास्क घातल्यास १०० ते ५०० रुपये दंड आकारला जात आहे. मात्र, इंडोनेशियात मास्क न घालणाऱ्यांना कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांसाठी कबर खोदण्यासाठी शिक्षा दिली जात आहे. इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतात गेल्या आठवड्यात सुमारे ३०० जणांना कबर खोदण्याची शिक्षा दिली गेली आहे. ही शिक्षा दिल्याने इंडोनेशियात नियम तोडणाऱ्यांची संख्या घटली आहे. सोमवारी गेरसिक रिजेन्सीत सर्वात कमी ८ जणांना विना मास्क पकडण्यात आले. त्यांनी शिक्षा म्हणून नॉबबेटन गावात कबर खोदल्या.

पूर्व प्रांतात कोर्म जिल्ह्याचे प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्यांचा तुटवडा आहे. यामुळे मास्क न घालणाऱ्या लोकांना या कामात लावले जात आहे. शिक्षा म्हणून दोन जणांना एक कबर खोदण्याचे आदेश दिले जात आहेत. ही शिक्षा मिळाल्याने भविष्यात लोक मास्क न घालण्याची चूक करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तिकडे, राजधानी जकार्तामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी १४ दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला. रस्त्यांवर कमी गर्दी दिसली. पोलिस विनामास्क बाइकस्वारांवर सक्ती करत आहेत. २७ सप्टेंबरपर्यंत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि अकादमिक आयोजनावर बंदी असेल. तर आवश्यक ११ सेवांमधील ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

सुमारे २७ कोटी लोकसंख्येच्या इंडोनेशियात आतापर्यंत कोविड- १९ चे २.२५ लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राजधानी जकार्तातही ५५ हजार जण बाधित आहेत. तर पूर्व जावामध्ये ३८ हजारांपेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर मृत्यूंच्या बाबतीत पूर्व जावा पहिल्या क्रमांकावर आहे. येथे कोरोनामुळे आतापर्यंत २८ मृत्यू झाले आहेत. पूर्ण देशात सुमारे ९ हजार जणांनी प्राण गमावले आहेत तर १.६१ लाख जण बरे झाले आहेत.