आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जपानमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहेत. आठवडाभरापासून सरासरी १००० रुग्ण रोज आढळताहेत. जपानने महामारीच्या आगमनाबरोबरच ३-सीवर लक्ष दिले होते. यात क्लोज्ड स्पेस, क्राउडेड स्पेस आणि क्लोज कॉन्टॅक्टवर लक्ष राहिले. आधी यात मदत झाली. मात्र मार्चमध्ये प्रकरणे वाढू लागली. एप्रिलमध्ये आणीबाणी लागली, मेमध्ये हटवली. जुलैत तर सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत सरकार अपयशी दिसत आहे. चूक कोठे झाली? तज्ज्ञांनी याबाबत विश्लेषण केले आहे...
लोकांपर्यंत म्हणणे गेले नाही, सरकार व संस्थांमध्ये समन्वय नव्हता
> चाचण्या वाढवल्या नाहीत : पहिल्या लाटेत लॅब टेस्टिंग वाढवल्या नाहीत. डॉक्टरांचा आग्रह असतानाही आरोग्य केंद्रांनी पीसीआर चाचण्या केल्या नाहीत. यामुळे कम्युनिटी ट्रान्समिशन रोखता आले असते. परिणाम अनडायग्नोज्ड रुग्ण वेगाने वाढले. तसेच डाॅक्युमेंटेन्शन मानवी पद्धतीने केले, यात चुका झाल्या.
> लोकांना समजावता आले नाही : लोकांना कडक नियमांच्या पालनासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देता आले नाही. यामुळे लोक ते सहज समजून वागू लागले. आणीबाणीतही योग्य पद्धतीने म्हणणाे मांडता आले नाही. लोकांना घरी थांबण्याची सक्ती, हात वारंवार धुणे, खाणे-पिणे योग्य करणे अशा गोष्टी सांगण्यात आल्या नाहीत.
> पारदर्शकता व जबाबदारीचा अभाव : टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय अचानक घेतला. यासाठी काय प्रक्रिया होती, यात उशीर का झाला याबाबत माहिती देण्यात आली नाही. यामुळे लोकांचा विश्वास घटला.
> समन्वय नसणे : सरकार आणि महामारी तज्ञ समितीत समन्वयाचा अभाव दिसला. समितीने संसर्गाच्या सुरुवातीलाच सामाजिक संपर्क ८०% घटवण्याची शिफारस केली होती. ते आणखी वाढवायला हवे होते. मात्र, सरकारने ते कमी करून ७०% व नंतर ६०% केले. यामुळे लोकांनी गांभीर्य राखले नाही.
> रुग्ण वाढत असतानाच समिती बरखास्त : सरकारने जूनमध्ये तज्ञ समिती बरखास्त केली. या वेळी प्रकरणे वाढू लागली होती. जुलैत स्थिती आणखी बिघडली. तर अंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी मोहीम सुरू केली. सध्या देशात ५५६६७ रुग्ण आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.