आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंग:चीनमध्ये जिनपिंग यांच्या विचारांचे धडे; शाळांमध्ये आयुक्तांची नेमणूक, चार तासांचे वर्ग

बीजिंग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या सर्व शाळांमधून राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विचारसरणीवर आधारित धडे गिरवले जाणार आहेत. त्यासाठी शाळांत आता राजकीय आयुक्तांची नेमणूक केली जाणार आहे. दरराेज चार तासांचे हे अनिवार्य वर्ग असतील. त्यांची नेमणूक तीन ते चार वर्षांसाठी असेल. तिचे स्वरूप कंत्राटी असेल. चीनमधील २० काेटी मुुलांना जिनपिंग यांची विचारसरणी शिकवण्यासाठी शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसे आदेश दिले आहेत. पीपल्स कम्युनिस्ट पार्टीच्या स्थानिक प्रशासकांची सहायक प्राचार्याच्या रूपाने निवड केली जावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सहायक प्राचार्य जिनपिंग यांचे राजकीय विचार सांगतील. शिकवतील. त्याचबराेबर त्याचा प्रचार-प्रसारही करतील. नर्सरी शाळांतही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या त्याला सक्तीचे स्वरूप देण्यात आलेले नाही. जिनपिंग यांच्या विचारांवर आधारित शिक्षणामुळे कम्युनिस्ट नेतृत्व तयार हाेऊ शकेल. चीनमध्ये स्थायी सरकारसाठी ही गाेष्ट आवश्यक असल्याचे एका गटाला वाटते.

राष्ट्रप्रेमाच्या भावनेला प्राेत्साहन : सरकारचा तर्क
मुलांना रेड जीन थिअरीचा परिचय करून देण्याचा चीनमधील सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्या विचारांवर आधारित नवीन पिढी निर्माण केले जाईल. सहा वर्षांच्या मुलास कम्युनिस्ट पार्टीविषयी प्रेम वाटावे आणि राष्ट्रप्रेमाची भावना वाढावी यासाठी गेल्या वर्षी राष्ट्रपतींनी आपल्या नव्या विचारांना अभ्यासक्रमात समाविष्ट केले हाेते. पीपल्स पार्टीचे मुख्यमंत्री पीपल्स डेलीच्या म्हणण्यानुसार पक्षाचे नेतृत्व देशाच्या समाजवादी शासनाचा आत्मा आहे. या कायद्याचे पक्षाने पालन केले पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पब्लिक सेक्युरिटी ब्यूरोच्या प्रशासकीय कार्यालयावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...